होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : शिरोळमध्ये ४,३९९ नागरिक होम क्वारंटाईन  

कोल्हापूर : शिरोळमध्ये ४,३९९ नागरिक होम क्वारंटाईन  

Last Updated: Mar 26 2020 5:53PM

शिरोळ ग्रामीण रूग्णालयाची पाहणी करताना मंत्री यड्रावकर यांच्यासोबत अधीक्षक डॉ. कुंभोजकर, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आदी.शिरोळ : पुढारी वृत्तसेवा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिरोळ आणि जयसिंगपूर शहरामध्ये १७४ खाटांचा आयसोलेशन व १९ खाटांचा व्हेंटिलेटर विभाग सज्ज केला आहे. दत्तवाड व शिरोळ ग्रामीण रुग्णालय आणि सात प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध साठा केला आहे. वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक तसेच आरोग्य सेवक यंत्रणा सज्ज केली आहे. शिरोळ तालुक्यात आजपर्यंत एकही कोरोना बाधीत रूग्ण सापडलेला नाही.

वाचा :कोल्‍हापूर : ग्रामीण भागात 'सोशल डिस्टन्सिंग

महाराष्ट्राच्या विविध शहरातून शिरोळ तालुक्यात आलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ४ हजार ३९९ इतकी झाली आहे. सर्वांची तपासणी करून चौदा दिवसासाठी होम क्वारंटाईन केले आहे. या प्रत्येकाच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. ज्यांच्या हातावर शिक्का नाही त्यांना दोन दिवसांत शिक्का मारला जाईल. जे नागरीक शिक्का मारून घेण्यास विरोध करतात त्यांना पोलिस बंदोबस्तात शिक्का मारला जाणार आहे. होम क्वारंटाईन झालेल्या एकानेही रस्त्यावर फिरायचे नाही. तसे आढळल्यास थेट पोलिस कोठडीत रवानगी केली जाईल, असा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला आहे.  

वाचा :कोल्हापूरकरांना आता भाजीपाल्याची चिंता नाही, हे वाचाच! (video)

गुरुवारी मंत्री यड्रावकर यांनी तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालये आणि सात प्राथमिक आरोग्य केंद्र व शिरोळ येथील शतायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली. त्यानंतर तहसिलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पी. एस. दातार, वैद्यकीय अधिक्षक डॉ.महेंद्र कुंभोजकर, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, अनिलराव यादव, मुख्याधिकारी तैमुर मुलाणी, डॉ. विशाल चौगुले, डॉ. कुलभुषण चौगुले, डॉ. रवींद्र भोसले, डॉ. राहुल खोत, डॉ. सुशांत पाटील यांची बैठक घेवून तालुक्याच्या सध्यस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर कोणकोणती औषधे, आवश्यक साधने लागणार आहेत याची माहिती घेतली.

शिरोळ शहरात ट्रॅक्टरच्या सहाय्याने हॉयड्रोसिक्लोरोफीन द्रावणाची फवारणी सुरू केली आहे. शहरात गेल्या चार दिवसात मुंबई - पुणे येथून १३५ प्रवाशी शहरात दाखल झाले आहेत. या सर्वांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवले असून घरी जाऊन चौकशी करण्यात येत आहे. 

वाचा :कोल्हापूर : हातकणंगलेत मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा