Fri, Jul 10, 2020 19:07होमपेज › Kolhapur › चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांची एकमेकांवर स्तुतीसुमने!

चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांची एकमेकांवर स्तुतीसुमने!

Published On: Sep 06 2019 2:27PM | Last Updated: Sep 06 2019 3:16PM
 कागल : प्रतिनिधी 

पालकमंत्री मोठ्या मनाचा सह्रदयी माणूस आहे. तसेच ते सर्वाधिक भाग्यवान आहेत, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे. तर आ. मुश्रीफ हा दानशूर मनाचा माणूस आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कागल पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उदघाट्नवेळी एकमेकांवर ही स्तुतीसुमने उधळली.

यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे व म्हाडाचे अध्यक्ष समरजीतसिह घाटगे. जि. प.चे शिक्षण व अर्थ समिती सभापती अमरीश घाटगे, सभापती राजश्री माने, उपसभापती विजय भोसले हे यावेळी उपस्थित होते. 

सर्वच नेते मंडळी एकत्रित असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र यावेळी पालकमंत्री, खासदार संजय मंडलिक व आमदार मुश्रीफ यांची फक्त भाषणे झाली. दरम्यान यावेळी बोलताना पालकमंत्री यांनी पूरग्रस्स्त नागरिकांना पर्यायी घरे महिन्यात उपलब्ध करून देण्याबरोबरच आचार संहितेपूर्वी पंचायत समिती सदस्यांना मानधनाचा जीआर काढणार असल्याचे सांगितले. 

मुश्रीफ व आमची युती, मात्र मार्गदर्शन संजय घाटगे यांचे : मंडलिक

दरम्यान, यावेळी बोलताना खा. मंडलिक म्हणाले, मुश्रीफ व आमची पंचायत समितीमध्ये युती आहे. मात्र कारभार करताना मार्गदर्शन हे माजी आमदार संजय घाटगे व अमरीश घाटगे यांचे घेतले जाते. 

मी संजय घाटगे यांना मित्र कसे म्हणू : मुश्रीफ

संजय घाटगे यांनी माझ्या विरोधात विविध अशा सात निवडणुका लढविल्या आहेत व आताही विधानसभेला ते माझ्या विरोधात लढणार आहेत. त्यामुळे मी त्यांना मित्र कसे म्हणू, असे आमदार मुश्रीफ म्हणाले. ते पुढे म्हणाले, मी तसेच संजय घाटगे, खा. संजय मंडलिक, अमरीश घाटगे हे पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका लढवून मोठे  झालो आहोत. थेट मोठे होता येत नाही.

पालकमंत्री पाटील यांचे म्हणाले...

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, जीवन क्षणभंगुर आहे. सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. निवडणुका येतात अन् जातात. आयुष्य मात्र सर्वाना प्रेमाने सोबत घेऊन जगले पाहिजे.