Thu, Aug 13, 2020 17:33होमपेज › Kolhapur › घरावर गुढी, भगवे ध्वज उभारून साजरा करा शिवराज्याभिषेक : वसंतराव मुळीक

घरावर गुढी, भगवे ध्वज उभारून साजरा करा शिवराज्याभिषेक : वसंतराव मुळीक

Last Updated: May 29 2020 11:31AM
कोल्हापूर :  पुढारी वृत्तसेवा 

शनिवारी (दि. 6 जून) साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने घरासमोर गुढ्या, भगवे ध्वज उभारून साजरा करूया असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. 

शिवराज्याभिषेक सोहळा जनतेचा लोकोत्सव बनवण्यात मराठा महासंघाने अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे. गेले 13 वर्षे मराठा महासंघ हा सोहळा दरवर्षी विविध उपक्रमांनी मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे. ज्यामध्ये डॉल्बीविरहित आणि प्रबोधनात्मक अशी भव्य पारंपरिक मिरवणूक, शिवरायांच्या चित्राचे अनावरण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आणि  महाराष्ट्रातील तज्ज्ञ व्यक्तींची शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला अशा लोकोपयोगी उपक्रमांचा समावेश असतो. 

पण, सध्या संपूर्ण जगासमोर कोरोना रुपी महासंकट उभे आहे. या परिस्थितीत 'अखंड सावधानता' हा शिवरायांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा गुणच कोरोनविरुद्धच्या लढाईत देशाला जिंकण्याची स्फूर्ती देईल. रयतेची काळजी करणाऱ्या शिवरायांचा हाच विचार घेऊन यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने. शाहीरी मुजरा करून साजरा करण्याचा निर्णय मराठा महासंघाच्या व सर्व समावेशक प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. 

ऑनलाईन कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित या बैठकीत राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, बबनराव रानगे, शाहीर दिलीप सावंत, प्रकाश पाटील, अशोक माळी, कादर मलबारी, उत्तम जाधव, इंद्रजीत माने, आनंद म्हाळूंगकर, शंकरराव शेळके, सौ शैलजा भोसले, के. एम. बागवान, उमेश पोर्लेकर, अवधूत पाटील, संजय कांबळे, शरद साळुंखे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.