Thu, Sep 24, 2020 06:25होमपेज › Kolhapur › चंद्रकांत पाटील म्हणतात, 'म्हणून' कोल्हापूर झेडपीतून भाजपची सत्ता गेली!

चंद्रकांत पाटील म्हणतात, 'म्हणून' कोल्हापूर झेडपीतून भाजपची सत्ता गेली!

Last Updated: Jan 03 2020 1:45PM

आमदार चंद्रकांत पाटीलपुणे : प्रतिनिधी 

कोल्हापूरमधील शिवसेनेचे स्थानिक नेते जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी वारंवार आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, असे म्हणत होते. मात्र, आदल्या रात्री मुंबईतून फोन आल्यानंतर सेनेच्या कोल्हापूर येथील नेत्यांनी पळ काढला. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

अधिक वाचा : मंत्री 'त्रिमूर्तीं'चे कोल्हापुरात ग्रँड वेलकम!

ते पुढे म्हणाले, की शिवसेनेने पळ काढला नसता, तर जिल्हा परिषदेवर आमची सत्ता राहिली असती. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपची ताकद कमी झाली, असे अजिबात नाही. आजही जिल्ह्यातील अनेक नगरपालिका, नगर परिषदा, पंचायत समित्या या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आम्ही हरलो, असे होणार नाही. आम्हाला हरवण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावे लागते, हेच आमचे मोठे यश आहे, असेही मत आ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत गुरुवारी सत्तांतर झाले. भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषदेतील पावणेतीन वर्षांची सत्ता महाविकास आघाडीने गुरुवारी संपुष्टात आणली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील यांची निवड झाली. अंतिम टप्प्यात अतिशय चुरशीची बनलेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

अधिक वाचा : नेते बंगला आणि खातं कुठलं मिळणार यात गुंग असतानाच राज्यात तब्बल ३०० शेतकऱ्यांची आत्‍महत्‍या!

मतदानाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ व काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील यांनी केलेल्?या जोडण्यांमुळे भाजप आघाडीचे 12 सदस्य फोडण्यात यश आले. शिवसेनेच्या दहापैकी तिघे सदस्य आघाडीबरोबर होते. उर्वरित 7 शिवसेना सदस्य, स्वाभिमानीचे दोघे, चंदगड आघाडी, ताराराणी व अपक्ष प्रत्येकी एक अशा 12 सदस्यांना महाविकास आघाडीत आणण्यात हे दोघे नेते यशस्वी झाले. त्यामुळे एकतर्फी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना 41 मते तर पराभूत भाजप आघाडीचे उमेदवार अरुण इंगवले व राहुल आवाडे यांना 24 मते मिळाली. 

अधिक वाचा : जळगाव झेडपीत खडसे महाजन यांच्यामध्ये मनोमिलन?

 "