Thu, Feb 27, 2020 22:23होमपेज › Kolhapur › आदित्य ठाकरेंनी घेतली कोल्हापुरातील पूरग्रस्तांची भेट

आदित्य ठाकरेंनी घेतली कोल्हापुरातील पूरग्रस्तांची भेट

Published On: Aug 20 2019 12:38PM | Last Updated: Aug 20 2019 2:23PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज कोल्हापूर उत्तर येथील बापट कॅम्प या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांना पाण्याच्या टाक्या तसेच एक महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

तसेच त्यांनी आज चिखली, आंबेवाडी या पूरग्रस्त भागाची देखील पाहणी केली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आयोजित महाआरोग्य शिबिरास भेट दिली.

परिस्थितीला घाबरून न जाता संपूर्ण शिवसेना पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी आहे, असा धीर त्यांनी दिला. यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैयशील माने, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांनी याआधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे या पुरग्रस्त गावाची पाहणी केली होती. त्यांनी ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.