Sun, Sep 27, 2020 03:57होमपेज › Kolhapur › इचलकरंजीकरांचा जीव भांडयात; 'त्या' कुंटूबातील तीन व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

इचलकरंजीकरांचा जीव भांडयात; 'त्या' कुंटूबातील तीन व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

Last Updated: Apr 22 2020 12:05PM
इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजीतील कोले मळ्यातील त्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाच्या नातवाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटूंबातील अन्य तिघांचे अहवाल प्राप्त झाले असून तिघांचीही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे काही अंशी इचलकरंजीकरांना दिलासा मिळाला.

सोमवारी ६० वर्षाच्या एका वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर त्याच्या चार वर्षाच्या नातवाला देखील लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे परिसरातील परिस्थिती चिंताजनक बनली होती. मात्र, हाती आलेल्या अहवालानुसार त्या कुटूंबातील अन्य तीन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  तसेच, इचलकरंजी येथील सांगली रोडवरील श्री दत्त कॉलनीतील दोघांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.

 "