Wed, Sep 23, 2020 08:37होमपेज › Kolhapur › कसबा बावड्यात तरुणावर कोयता हल्‍ला : तिघांवर गुन्हा

कसबा बावड्यात तरुणावर कोयता हल्‍ला : तिघांवर गुन्हा

Last Updated: Aug 12 2020 1:25AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

कसबा बावडा येथे सागर शामराव सुतार (वय 29, रा. आंबे गल्‍ली, कसबा बावडा) याच्यावर पूर्ववैमनस्यातून कोयता हल्‍ला करण्यात आला.  रविवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी विकास वेताळे, साहिल शेख, सुदर्शन चव्हाण (तिघे रा. कसबा बावडा) या तिघांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

 सागर सुतार याचे रविवारी भांडण झाले होते. सायंकाळी तो मित्र अक्षय, अमनसोबत कसबा बावड्यातील महाविद्यालय आवारात थांबला होता. यावेळी संशयित विकास वेताळे, साहिल शेख व सुदर्शन चव्हाण हे तिघे तेथे आले. सकाळी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सागरला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने हल्‍ला केला. सागरने पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण तिघांनी पाठलाग करत त्याच्यावर वार केले. यामध्ये सागरच्या डाव्या बाजूच्या बरगडीवर, डाव्या हातावर गंभीर दुखापत झाली. त्याला  खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सागरने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 "