Thu, Jul 09, 2020 06:29होमपेज › Kolhapur › लग्‍न होत नसल्याने तरुणाची आत्महत्या

लग्‍न होत नसल्याने तरुणाची आत्महत्या

Last Updated: Dec 04 2019 12:38AM
सांगरूळ : वार्ताहर 
लग्‍न जुळत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाने घराच्या पाठीमागील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सांगरूळ (ता. करवीर) येथे घडला आहे. नितीन निवृत्ती नाळे (वय 36) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेली अनेक वर्षे लग्‍न ठरत नसल्याने नितीन सतत ताणतणावात असायचा. या नैराश्याचा गंभीर परिणाम त्याच्या मनावर झाल्याने, गेली पाच वर्षे त्याच्यावर कोल्हापूर येथील  मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अश्‍विन शहा  यांच्याकडे उपचार सुरू होते. लग्‍न होत नसल्याच्या नैराश्यातूनच मंगळवारी पहाटेच्या सुमारास नितीन याने घराच्या पाठीमागे असलेल्या गोठ्यात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी त्याची आई जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेली असता ही घटना निदर्शनास आली.