Mon, Sep 21, 2020 11:53होमपेज › Kolhapur › 'सांस्कृतिक हॉल कोविड सेंटरसाठी खुला'

'सांस्कृतिक हॉल कोविड सेंटरसाठी खुला'

Last Updated: Aug 05 2020 3:01PM

संग्रहीत छायाचित्रकुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा

शिरोळ तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रुग्णांच्यावर उपचार करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. तालुक्यातील रुग्णांच्यावर तालुक्यातच औषध उपचार करण्यासाठी शिरोळ रस्त्यावरील संजय सांस्कृतिक हॉल येथे कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी डॉ. संजय पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान जिल्हाधिकारी दौलत देसाई तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांना पत्र दिले, असून दोन दिवसांत प्रशासनातर्फे पाहणी करण्यात येणार आहे. शासनाला मदत म्हणून विनामूल्य कार्यालय देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

'खासगी रुग्णालयांनी उपचार नाकारल्यास गुन्हा दाखल करु'

पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले, गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाने देशात थैमान घातले आहे. जिल्ह्यात आणि तालुक्यातही कोरोनाने डोके वर काढले आहे. प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. शिरोळ तालुक्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून प्रशासनाला मदतीचा भाग म्हणून नृसिहवाडी पासून काही अंतरावर असलेल्या शिरोळ रस्त्यावरील संजय सांस्कृतीक हॉलमध्ये कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी जिल्हाधिकारी देसाई, तहसिलदार डॉ. सौ मोरे-धुमाळ यांच्याकडे केली आहे. सामाजिक सेवा म्हणून विनामूल्य शासनाला देणार आहे. कुरुंदवाड व नृसिहवाडी गावाच्या बाहेर कार्यालय असल्याने कोविड सेंटरसाठी हे कार्यालय उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

 "