ढगाळ हवामान, गार वारा वाहतोय! जाणून घ्या हवामानातील हा बदल कशामुळे? (व्हिडिओ)

Last Updated: Nov 28 2020 7:31PM
Responsive image


ऑनलाईन डेस्क

कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नाशिक आणि राज्यातील काही भागांत आज (शनिवारी) ढगाळ हवामान आहे. यासोबतच गार वारा वहात आहे. यामुळे हवामानातील हा अचानक बदल कशामुळे? या हवामानाचा शेती आणि आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होणार तर नाही, असा प्रश्न अनेकांना पडला. याबाबत हवामान तज्ज्ञ शंतनू पाटील यांनी, सध्याच्या हवामानातील बदल हा निवार चक्रीवादळाच्या प्रभावाने झाला असल्याचे म्हटले. हवामानात उद्यापर्यंत बदल होऊन पुन्हा ते पुर्ववत होईल, असेही त्यांनी पुढारी ऑनलाईनशी संवाद साधताना सांगितले.

वाचा : कोविशिल्‍ड लस सुरक्षित; लसीचे वितरण पहिल्यांदा भारतात होणार : अदर पुनावाला 

तामिळनाडूत धडकलेल्या निवार चक्रीवादळामुळे निर्माण झालेले ढग पुढे सरकत आले आहेत. त्यामुळे पूर्वेकडून गार वारे वहात आहे. त्यात महाराष्ट्रात थंडीची लाट आहे. ढगाळ हवामान असल्याने सूर्यप्रकाश नाही. यामुळे तामपानाचा पारा खाली घसरणार आहे. सध्याचे वातावरण अल्हाददायक आहे. 

निवार चक्रीवादळाची तीव्रता मोठी होती. हे वादळ निवळले असले तरी बंगालच्या उपसागरातील पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान वाढले आहे. यामुळे आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आणखी एक चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. निवार चक्रीवादळावेळी जेवढा तीव्रतेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तेवढ्या तीव्रेतेचा कमी दाबाचा पट्टा सध्या तयार झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी एखादे वादळ येऊ शकते, असे शंतनू पाटील यांनी म्हटले आहे.

वाचा : ...तर लढण्यासाठी पुन्हा एकत्र यावं लागेल : भुजबळ

हवामानात अचानक बदल झाल्याने आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. त्यासाठी विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यायला हवी. त्यांना उबदार कपडे आणि पोषक आहार देण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

वाचा : पालघर : आदिवासी महिलेला झोळीतून नेताना वाटेतच झाली प्रसूती, बालकाचा मृत्यू, मातेची मृत्यूशी झुंज  

तसेच सध्या ऊस तोड हंगाम सुरु आहे. बदललेल्या हवामानाची शेतकऱ्यांना धास्ती वाटत असल्याच्या पार्श्वभूमीवर शंतनू पाटील यांनी, शेतकऱ्यांनी पावसाची काळजी करु नये, असे म्हटले आहे. हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परिणाम होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  

 

IPL 2021: संजू सॅमसन ‘राजस्थान रॉयल्स’चा कर्णधार


'एमपीएससी'च्या याचिकेमुळे संताप! अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी


शेतकरी आंदोलन : केंद्राची लवचिक भूमिका; शेती सुधारणा कायदे २ वर्षापर्यंत स्थगित ठेवण्याचा केंद्राचा प्रस्ताव!


मराठा आरक्षणावर राज्य सरकार टोलवाटोलवी : आ.शिवेंद्रराजे भोसले यांचा घणाघाती आरोप


हिंगोली : डिग्रसवाणी गावात वंचितने दिला फाॅरेन रिटर्न पीएचडी स्काॅलर उमेदवार अन् आख्खं पॅनेलच गावानं निवडून दिलं


सातारा : वादग्रस्त दगडी खाण अखेर झाली सील


अच्छा चलतै हे हम! अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडले


जळगाव : ग्रामसेवकांवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई; आठ निलंबित, पाच जणांना अटक


हिंगोली : डिग्रसवाणी गावात वंचितने दिला फाॅरेन रिटर्न पीएचडी स्काॅलर उमेदवार अन् आख्खं पॅनेलच गावानं निवडून दिलं


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविषयीच्या ‘या’ १० गोष्टी जाणून घ्याव्याच लागतील..