Sat, Jul 04, 2020 00:32होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : माणुसकीचे दर्शन, पूरग्रस्तांना दिलासा

कोल्हापूर : माणुसकीचे दर्शन, पूरग्रस्तांना दिलासा

Published On: Aug 09 2019 12:25PM | Last Updated: Aug 09 2019 12:25PM

कोल्हापूर : माणुसकीचे दर्शन, पुरग्रस्तांना दिलासापट्टणकोडोली : वार्ताहर 

पट्टणकोडोली येथील अतिवृष्टीमुळे अलाटवाडी, शेरीमळा व मोरेमळा या भागातील १०० टक्के नागरिकांना सर्वात मोठा फटका पहिल्यांदा बसला. संपुर्ण परिसर आणि घरे पुरात बुडून गेली आहेत. त्यामुळे परिसराला बेटाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सर्वच नागरिक स्थलांतरित झाले आहेत. नागरिकांनी आपल्या जीवनावश्यक वस्तू राहत्या घरी सोडून आल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा प्रसंगी अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देवून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधीलकी जोपासली. 

इंगळी गावातील पूरग्रस्त कुटुंबे जनावरांसह अलाटवाडी येथील गणपती मंदिर परिसरात आश्रयाला आली आहेत. त्यांच्या जनावाऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत काही दानशूर व्यक्ती पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. 

हुपरी जवाहर कारखान्याच्यावतीने जनावरांसाठी चारा देण्यात आला. कोल्हापुर येथील उद्योगपती चिन्मय कडेकर व दिपक शिरगुप्पीकर, बिग बझारचे मालक व ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे सुनिल शेळके, मेघना शेळके तसेच रोटरी क्लब ऑफ गारगी यांच्यावतीने चपाती, भाजी नाष्टा देण्यात आला तर नेर्ली ग्रामस्थांच्या वतीने पुरग्रस्तांना भाकरीचे वाटप करण्यात आले. सुदर्शन जिन्स पंचतारांकित एम.आय.डी.सी यांच्यातर्फे बिसलरी पाण्याचे वाटप करण्यात आले.

सहकार बेकरी यळगुड यांच्या वतिने मस्कापाव, ब्रेड व बेकरी साहित्य वाटप करण्यात आले, तर उंचगाव येथील मायक्रोनेट लर्निंगचे संस्थापक संचालक चंद्रकांत पाटील यांच्यावतीने चिरमुरे व फरसाण्याचे वाटप करण्यात आले. याचबरोबर पट्टणकोडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतिने पुरग्रस्तांना औषधाचे वाटप करण्यात आले. याशिवाय ज्ञात - अज्ञात नागरीकांनीही विविध रुपाने मदतीचा हात दिला आहे. 

याशिवाय पट्टणकोडोली गावातील प्राथमिक मुलांची शाळा व कन्या शाळेमध्ये इंगळी गावातील पूरग्रस्त चारशे ते पाचशे कुटुंबे जनावरांसह मुक्कामास असून त्यांना गावातील तरूण मंडळे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात मसुरकर, आण्णा जाधव आदींनी  भोजनाची व्यवस्था केली. गावातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना जनावरासह पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत केली. प्राथमिक आरोग्य विभागाने आरोग्यसेवा पुरवली,