Thu, Sep 24, 2020 06:30होमपेज › Kolhapur › बर्कीत ‘व्हिलेज पार्क’

बर्कीत ‘व्हिलेज पार्क’

Published On: Apr 07 2018 2:00AM | Last Updated: Apr 07 2018 12:58AMकोल्हापूर : अनिल देशमुख

निसर्ग पर्यटन वाढावे, यासाठी बर्कीचे रूप पालटले जाणार आहे. या ठिकाणी ‘व्हिलेज पार्क’ साकारला जाणार आहे. जून महिन्यापासून त्याचे काम सुरू केले जाणार आहे. विशेष म्हणजे, कोणतेही नवे बांधकाम न करता गावाला नवा लूक दिला जाणार आहे.

शाहूवाडी तालुक्यातील बर्की हे गाव धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक बर्कीला येत असतात. हे पर्यटक कायमस्वरूपी गावात यावेत, याकरिता ‘इको’ आणि ‘अ‍ॅग्रो’ टूरिझम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बर्की गावात ‘व्हिलेज पार्क’ साकारला जाणार आहे. या पार्कमध्ये बोटिंग, ट्रेकिंग आदीची सुविधा देण्यात येणार आहे. यासह पर्यटकांना बैलगाडी रायडिंग, तसेच बफेलो (म्हैस) रायडिंग, ट्रॅक्टर रायडिंग करता येणार आहे. पारंपरिक खेळ, पारंपरिक नृत्य यासह पारंपरिक जेवणाचाही आस्वाद या ठिकाणी घेता येणार आहे. रात्री आकाश निरीक्षणाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

‘व्हिलेज पार्क’ साकारताना कमीत कमी नवे बांधकाम, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गावातील घरांच्या भिंती आकर्षक पद्धतीने रंगवण्यात येणार आहेत. रस्त्यांवर माहिती, मागदर्शक फलक लावण्यात येतील. रस्तेही आकर्षक पद्धतीने करण्यात येणार आहेत. यानिमित्ताने गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहे.

पर्यटकांना अधिक पायाभूत सुविधा देण्याबरोबरच पर्यटकांची गर्दी कायम राहील, या दृष्टीने हा पार्क उभारण्यात येत आहे, त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढवण्यास मोठी मदत होणार असल्याचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ला यांनी सांगितले.
 

Tags : kolhapur district Berke, Village Park