Fri, Sep 25, 2020 11:27होमपेज › Kolhapur › मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल

मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल

Published On: Apr 24 2019 1:38AM | Last Updated: Apr 24 2019 12:24AM
कोल्हापूर  : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. मतदानादरम्यान मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असताना देखील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी व तरुण मतदारांनी उत्साहाच्या भरात मतदान करतानाचे फोटो काढले.

काहींनी चक्‍क ईव्हीएम मशिनवर आपले मत नोंद करतानाचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर शेअर केले. मोबाईल नेण्यास व चित्रीकरण करण्यावर बंदी असतानाही मतदान करतानाचे फोटो, व्हिडीओ दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

सांगून सवरून...

सांगून सवरून मतदान केलाय आमच्या उमेदवाराला... अशा प्रकारचे स्टेटस लावून मतदान करतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करण्याचे प्रकार मतदानादरम्यान पाहायला मिळत होते. मतदान कोणाला करावे हे सर्वस्वी मतदारावर अवलंबून आहे. मात्र, ते कोणाला केले हे इतरांना कळू नये व मतदाराला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी बंद खोलीमध्ये बॉक्स करून त्याठिकाणी मतदान यंत्रे ठेवण्यात येतात. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी यंदा मतदानावेळी मोबाईल आतमध्ये नेण्यास बंदी घातलेली असतानाही असे प्रकार घडले.