Wed, Sep 23, 2020 08:33होमपेज › Kolhapur › पंचगंगा पात्राकडे; वीस बंधारे खुले

पंचगंगा पात्राकडे; वीस बंधारे खुले

Last Updated: Aug 12 2020 1:16AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीतही घट होत आहे. पंचगंगेचे पाणी पात्राकडे चालले आहे. मंगळवारी जिल्ह्यातील आणखी वीस बंधारे खुले झाले असून त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. 

जिल्ह्यात मंगळवारी  अधूनमधून कोसळणारी सर वगळता पावसाने विश्रांतीच घेतली आहे.  सकाळी आठपर्यंत गेल्या 24 तासांत सहा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणाचे सोमवारी खुले झालेले दोन स्वंयचलित दरवाजे मंगळवारीही खुलेच होते. त्या दरवाजासह वीजनिर्मिती असा धरणातून एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  तुळशी, चिकोत्रा आणि चित्री वगळता सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात 47 बंधारे पाण्याखाली होते. आज त्यापैकी 20 बंधार्‍यांवरील पाणी ओसरले. त्यामुळे त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली. जिल्ह्यात सध्या 27 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. त्यावरील वाहतूक मात्र पर्यायी मार्गाने सुरू आहे. पंचगंगेचे पाणी गंगावेश-शिवाजी पूल रस्त्यावर गायकवाड वाड्यासमोर होते. आज हा रस्ता पूर्ण मोकळा झाला. त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. दिवसभरात पंचगंगेची पातळी दोन फुटांनी कमी झाली. सकाळी सात वाजता पंचगंगेची पातळी 38.2 फूट होती. सायंकाळी सात वाजता ती 36. 4 फुटांपर्यंत खाली आली होती. पंचगंगेचे पाणी पात्राकडे जात आहे.

 "