Thu, Sep 24, 2020 11:11होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : ईव्हीएम - व्हीव्हीपॅटसाठी १२ कोटी ५० लाखाच्या गोदामाला मंजूरी

कोल्‍हापूर : ईव्हीएम - व्हीव्हीपॅटसाठी १२ कोटी ५० लाखाच्या गोदामाला मंजूरी

Last Updated: Jan 17 2020 8:16PM

संग्रहित फोटोकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूर जिल्ह्यात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यासाठी गोदाम बांधण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तब्बल बारा कोटी पन्नास लाखांचा निधी या कामासाठी मंजूर झाला. हा आदेश अ.ना.वळवी, उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी काढला आहे. यामुळे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट साठवणूकीसाठी नव्याने गोदाम बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

अधिक वाचा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या वेगवेगळया निवडणूकांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन बाहेरून मागवावे लागत होती. यासाठी जिल्हा प्रशासनाला निवडणूकांच्या आधिपासूनच पत्रव्यवहार आणि प्रशासकिय मान्यता मिळवाव्या लागत होत्या. आता या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील निवडणूकांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बाहेरून मागवावे लागणार नाहीत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची कायमस्वरुपी साठवणूक करण्यासाठी हे गोदाम बांधण्यात येणार आहेत. या शासन निर्णयानुसार या गोदामाचे बांधकाम कमीत कमी खर्चात व्हावे. तसेच भारत सरकारच्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे गुणवत्तापूर्ण होईल याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असणार आहे. तर गरज वाटल्यास जिल्हाधिकारी ई-टेंडरिंग पध्दतीचा वापर करू शकतात. 

अधिक वाचा : कोल्हापूर : जयसिंगपूर पोलिस ठाण्यातून चोरलेले पोते भरून मोबाईल सापडले; दोघांना अटक

गोदाम बांधकामासह पावसाचे पाणी साठवणे (water Harvesting) करणे, संरक्षण भिंत आणि गेट, सौर ऊर्जेचे पॅनेल (Solar Roof Top) यासह सीसीटीव्ही संच लावणे अशा कामासाठी बारा कोटी पन्नास लाख तेवीस हजार मंजूर झाले आहेत. 

 "