Sat, Feb 29, 2020 18:10होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : हजारो हेक्टर ऊस महापुराच्या विळख्यात

कोल्हापूर : हजारो हेक्टर ऊस महापुराच्या विळख्यात

Published On: Aug 08 2019 3:16PM | Last Updated: Aug 08 2019 3:23PM

हजारो हेक्टर ऊस महापुराच्या विळख्यातहुपरी : अमजद नदाफ

हे छायाचित्र महापूराचे निश्चित आहे, मात्र या पाण्याखाली हजारो हेक्टर उभे ऊस पीक आहे. तेही दहा ते बारा फुटांचा या पाण्यात गायब झाले आहे. या परिसरात ऊसाचे शेती होती हे सांगावे लागण्याची वेळ आली आहे. महापूराच्या वेढ्यात हजारो हेक्टर उभे उस पीक सापडले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयाचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. गेली दहा दिवस उस पीक पाण्यात आहे. 

हातकणंगले शिरोळ तालुके महापुराने वेढल्यामुळे, हजारो कुटुंबे निर्वासीत झाली आहेत. सर्वत्र हाहाकार उडाला आहे. या दोन तालुक्यात ऊस क्षेत्र मोठे असून नगदी पीक म्हणून उसाची शेती मोठया प्रमाणावर केली जाते. जवळपास हजारो शेतकरी उसावर अवलंबून आहेत. गेल्या दहा दिवसांपासून हजारो हेक्टर ऊस पीक पाण्याखाली आहे. गेला जास्त दिवस पीक पाण्यात राहिल्यामुळे ती पिके कुजण्याचा धोका आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास या महापुराने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

दहा बारा फुटाचा उस पाण्यात गायब 

रांगोळी, पट्टणकोडोली, इंगळी, रुई, माणगाव, आदी गावांतील उस पूर्ण पाण्यात गेला आहे. रांगोळीजवळ तर दहा बारा फुटाचा उसच गायब झाल्यासारखे वाटत आहे. संपूर्ण परिसर पाण्याने व्यापला आहे त्यामुळे हा उस कुजण्याचा धोका असल्यामुळे शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे.