Tue, Aug 04, 2020 14:09होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्या १ हजार पार

कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्या १ हजार पार

Last Updated: Jul 07 2020 8:50PM
कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्‍हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने एक हजारचा आकडा ओलांडला आहे. यामुळे जिल्‍ह्यातील यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. 

आज (मंगळवार) रात्री 8 वाजेपर्यंत 28 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्‍णांची संख्या 1012 वर पोहोचली आहे. 

दरम्‍यान, 763 जण कोरोनातून मुक्‍त झाले आहेत. दरम्‍यान कोरोना मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. सध्या 249 पॉझिटिव्ह रूग्‍णांवर उपचार सुरू आहेत. 

आज जिल्ह्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये इचलकरंजीतील 75 वर्षाच्या वृध्देसह 73 वर्षाच्या वृध्दाचा समावेश आहे. या दोघांचेही अहवाल मृत्‍यूनंतर पॉझिटिव्ह आले आहेत.