होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : महामार्गावर अजूनही ठप्प; पाणी पातळी अर्ध्या फुटाने ओसरली

कोल्हापूर : महामार्गावर पाणी पातळी अर्ध्या फुटाने ओसरली

Published On: Aug 10 2019 8:40AM | Last Updated: Aug 10 2019 8:31AM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : प्रतिनिधी

तावडे हॉटेल ते सांगली फाटा राष्ट्रीय महामार्गावरील महापुराच्या पाण्याची पातळी रात्रीत सहा इंचाने ओसरली. त्यामुळे आज सकाळी (ता.१०) आठ वाजता पातळी चार फुटांवर आहे. काल रात्री ही पातळी साडेचार ते पावणे पाच फुटांवर होती. रात्रीत अर्ध्या फुटाने पातळी कमी झाली. 

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके व पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सकाळी साडे आठ वाजता महामार्गावरील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. पुलावरील पाणी प्रभावाचा अंदाज घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरू करण्याबाबत घेणार आहेत. पंचगंगेच्या पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने महामार्गावरील आठ ते दहा फूट पाणी आले होते. पाण्याला प्रचंड ओढा असल्याने आज पाचव्या दिवशी सकाळपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी कराड ते तवंदी घाट या दरम्यान सहा हजार वाहने पाच दिवसापासून अडकून पडले आहेत.