Sun, Sep 27, 2020 03:56होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : यंदा पाणीटंचाई भासणार नाही  

कोल्हापूर : यंदा पाणीटंचाई भासणार नाही  

Last Updated: Feb 15 2020 1:39PM

राधानगरी धरणराशिवडे (कोल्हापूर) : प्रवीण ढोणे 

उन्हाळ्याची चाहुल लागली असताना राज्याच्या धरणातील पाणीसाठा अतिसमाधानकारक राहिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्याचा पाणीसाठा दुप्पटीने शिल्लक असून आता पाणीटंचाईसारख्या संकटास तोंड द्यावे लागणार नाही, अशी समाधानकारक स्थिती या ठिकाणी आहे. पुणे, कोकण, नाशिक विभागामध्ये सर्वाधिक साठा शिल्लक असुन अन्य विभागातही अतिसमाधानकारक स्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशी, राधानगरी, तिल्लारी आणि काळम्मावाडी धरणामध्ये सरासरी ७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिकांसह पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासणार नाही.

वाचा : कोल्हापूर : कसबा सांगावमध्ये घरगुती गॅसचा स्फोट, लहान मुलासह दोन जखमी

राज्यात अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या सहा विभागामध्ये मोठी, मध्यम, लघू अशी ३२६७ धरणे आहेत. या धरणांमध्ये गतवर्षी ३७.७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. परंतु चालुवर्षी लांबलेला पाऊस, पुरस्थितीमुळे धरणातील पाण्याचा वापर म्हणावा तितका न झाल्याने पाणीसाठ्याची स्थिती सर्वोत्तम आहे. राज्यातील १४१ मोठ्या धरणांमध्ये गतवर्षी ३८.२४ टक्के पाणीसाठा होता. तर सध्या हा पाणीसाठा ७३.५८ टक्के आहे. तर मध्यम २५८ धरणांमध्ये गतवर्षी ३७.५८ टक्के साठा होता. तर सध्या हा पाणीसाठा ५६.८६ टक्के आहे. तर २८६८ लघु धरणांमध्ये गतवर्षी २५.५५ टक्के पाणीसाठा होता. तर सध्या हा पाणीसाठा ३७.०७ टक्के इतका आहे. साहजिकच राज्याला वरदान ठरणाऱ्या मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये दुप्पटीने पाणीसाठा शिल्लक आहे.            

राज्यातील विभागनिहाय धरणे व पाणीसाठा पुढीलप्रमाणे, कंसात गतवर्षीचा पाणीसाठ्याची टक्केवारी

१) अमरावती- ४४६ धरणे ५६.५४ (३४.९४)
२) औरंगाबाद- ९६४ धरणे ५६.६३ (१०.३७)
३) कोकण-१७६ धरणे ७०.३७ (५८.८३)
४) नागपूर- ३८४ धरणे ६१.४६ (१८.०७)
५) नाशिक- ५७१ धरणे ७२.०२ (३४.१८)
६)पुणे- ७२६ धरणे ७०.४३ (४९.८६)

वाचा : नांदेड : कर्जाला कंटाळून बाप- लेकाची आत्महत्या

कोल्हापूर जिल्ह्यात ७० टक्के पाणीसाठा शिल्लक

जिल्हयातील तुळशी, धामोड, राधानगरी, काळम्मावाडी आणि तिल्लारी धरणांमध्ये सरासरी ७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या या धरणांमध्ये धामोड ८५ टक्के, राधानगरी ७२ टक्के, तिलारी ६१ टक्के आणि काळम्मावाडी ७४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

राज्यातील धरणांमध्ये ३४३८७ दलघमी पाणीसाठा असुन यामध्ये ७४९३ दलघमी मृतसाठा आहे. त्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचत आहे हे स्पष्ट होत आहे.

 "