Thu, Sep 24, 2020 07:37होमपेज › Kolhapur › विधानसभा लढवणारच, गुडघे टेकणार नाही : संजय घाटगे

विधानसभा लढवणारच, गुडघे टेकणार नाही : संजय घाटगे

Published On: Jul 13 2019 9:02PM | Last Updated: Jul 13 2019 10:19PM
भडगाव : वार्ताहर

आतापर्यंत सत्तेची साथ नसतानाही आपण मातब्बर विरोधकांशी लढत राहिलो. गत विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत नसतानाही 1,17,700 मते आपल्याला मिळाली. आता खा. संजय मंडलिक यांच्याशी विचार विनिमय करून विधानसभा रिंगणात उतरणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले.

भडगाव (ता. कागल) येथे अन्‍नपूर्णा शुगर फॅक्टरी व जॅगरी कारखाना नियोजन व कार्यकर्त्यांशी संपर्क दौर्‍यात ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी दादासो पाटील होते. घाटगे म्हणाले, राजकारणात आजपर्यंत कोणापुढेही गुडघे टेकले नाहीत. आगामी विधानसभा निवडणूक जोमानेच लढवायची, असेही ते म्हणाले. यावेळी साताप्पा परबकर, एच. बी. पाटील, रणजित मुडूकशिवाले, शिवाजी पाटील, विठ्ठल पाटील, मानसिंग कमळकर, पांडूरंग घुगरे, शिवाजी मेंगाणे, बचाराम पाटील, लक्ष्मण चौगले उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक बाजीराव गोते यांनी केले.

कागलमध्ये होणार तिरंगी लढत.... 

विधानसभा निवडणकीसाठी केवळ अडीच महिन्यांचा कालावधी शिल्‍लक राहिल्याने कागल तालुक्यात ऐन पावसाळ्यात राजकीय हालचाली गतिमान होत असून, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपचे व म्हाडा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी विधानसभा लवढवणारच, असे अनेक कार्यक्रमांतून जाहीर केले आहे. तर माजी आमदार संजय घाटगे यांनी या पूर्वी शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले असून शिवसेनेकडून विधानसभेच्या रिंगणात उतणार असल्याने कागल तालुक्यात विधानसभा निवडणूक तिरंगी होणार असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.