Sun, Aug 09, 2020 10:56होमपेज › Kolhapur › महिलेच्या डोक्यात घातला दगड

महिलेच्या डोक्यात घातला दगड

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:30AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

येथे सांगली-कोल्हापूर महामागार्र्लगत पोस्ट कार्यालयासमोर असणार्‍या श्रद्धा खानावळीत झोपलेल्या महिलेच्या डोक्यात अज्ञाताने दगड घातला. या घटनेत ही महिला गंभीर जखमी असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. लक्ष्मी मुंजे (वय 46) असे महिलेचे नाव आहे. दरम्यान, रात्री उशिरा संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.सांगली सिव्हिल रुग्णालयात अतिदक्षता विभागात महिलेवर उपचार सुरू आहेत. डोक्यात दगड घालणारा अज्ञात हल्लेखोर हा परिसरातीलच असल्याची चर्चा आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसांत रात्री उशिरा  गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. भरदिवसा हल्ल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. ही घटना तीन ते साडेतीनच्या दरम्यान घडली. 

महिला व तिचा पती गेल्या दोन-तीन वर्षांपासून या महामार्गालगत शहरातील ल. पा. गर्ल्स हायस्कूल रोडवर खानावळ चालवितात. जखमी लक्ष्मी या दुपारी खानावळीमध्ये झोपल्या होत्या. यावेळी अज्ञात इसमाने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खानावळमधील साहित्य व खुर्च्या-टेबल विस्कटून पसार झाला. यावेळी खानावळीत असलेल्या लहान मुलीस हल्लेखोराने चॉकलेट आणण्यासाठी पाच रुपये देऊन बाहेर पाठविले. त्यानंतर काही क्षणात हल्ला करून पसार झाला.

हल्लेखोर हा परिसरातीलच असून, त्याच्या नावाबाबतही चर्चा सुरू होती. त्याने या महिलेवर डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा का प्रयत्न केला असावा, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. खानावळसमोर चपला पडल्या होत्या. चारच्या सुमारास जखमी अवस्थेतील लक्ष्मी मुंजे यांना नातेवाइकांनी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.त्यांची प्रकृती गंभीर व चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. सहाच्या सुमारास घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेतली. रात्री उशिरा जखमी महिलेचा पती व मुलगा पोलिस ठाण्यात आले होते. याबाबतची फिर्याद त्यांची मुलगी दीपाली राजेंद्र हरकळ यांनी दिली आहे.

Tags : Kolhapur, stone, inserted, woman, head