होमपेज › Kolhapur › जनतेचा कौल मान्य, जनसेवेत कायम कार्यरत राहणार : धनंजय महाडिक 

जनतेचा कौल मान्य, जनसेवेत कायम कार्यरत राहणार : धनंजय महाडिक 

Published On: May 23 2019 11:57PM | Last Updated: May 23 2019 11:57PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर महाडिक यांनी जनतेचा कौल मान्य असल्याचे सांगत, जनसेवेत कायम कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

यावेळी महाडिक म्हणाले, लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने दिलेला कौल मी स्वीकारत असून, निवडणूकीचा निकाल अनपेक्षित असला तरी मला मान्य आहे. गेल्या ५ वर्षात खासदार म्हणून मी कोल्हापूरच्या विकासासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न केले. अनेक विकासकामे पूर्णत्वास आली तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. येत्या वर्षभरात अनेक कामे प्रत्यक्ष उभारतील अशी आशा आहे. या निवडणुकीचा निकाल स्वीकारून, मी पुन्हा उद्यापासून जनतेच्या सेवेसाठी यथाशक्ती काम करण्यास तयार आहे. माझ्यावर विश्वास ठेवून, ज्या मतदारांनी मला मतदान केले, माझ्यासाठी प्रचार यंत्रणा राबवली, त्या सर्व नागरिक, कार्यकर्ते, नेते आणि महिला भगिनींचे त्यांनी यावेळी आभार मानले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना पराभव स्वीकारावा लागला. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाडिकांना तब्बल लाखाच्या मताधिक्याने अस्मान दाखवत संसदेत प्रवेश केला आहे. आता केवळ मंडलिकाच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे.