Wed, Sep 23, 2020 08:52होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले

कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी 793 रुग्ण वाढले

Last Updated: Aug 08 2020 1:32AM

संग्रहीत छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात शुक्रवारी आजवर एकाच दिवसात उच्चांकी 793 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 9,463 वर गेली असून, येत्या दोन-तीन दिवसांतच जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा दहा हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात दिवसभरात 14 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 जण हातकणंगले तालुक्यातील, तिघे इचलकरंजी शहरातील, पन्हाळा तालुक्यातील दोघे, तर शिरोळ, गडहिंग्लज आणि कोल्हापूर शहरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडापार्क येथील प्रयोगशाळा निर्जंतुकीकरणासाठी दोन दिवस बंद ठेवण्यात आली होती. उद्या शनिवार (दि. 8) पासून ती पुन्हा सुरू केली जाणार आहे. दरम्यान, सीपीआर, आयसोलेशनसह कोरोना रुग्णालयातील प्रलंबित स्वॅब पैकी काही स्वॅब तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळेत देण्यात आले होते. त्यापैकी 453 जणांचे खासगी लॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय प्रयोगशाळेत तपासणी झालेल्या 340 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात आढळून आलेल्या 793 कोरोनाबाधितांपैकी तब्बल 283 रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत. यामध्ये  महापालिकेच्या केएमटीचे 2 व आस्थापनेतील 2 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. एकाच दिवसात 4 कर्मचारी बाधित आढळून आल्याने महापालिकेत पुन्हा खळबळ उडाली आहे.

हातकणंगले तालुक्यात 202 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी इचलकरंजी शहरातील 27 जणांचा समावेश आहे. करवीर तालुक्यात 64 रुग्ण आढळून आले. शिरोळ तालुक्यात 55 रुग्ण आढळले. राधानगरी तालुक्यात 14 नव्या रुग्णांची भर पडली आहे. शाहूवाडी तालुक्यात  6 नवे रुग्ण आढळून आले. पन्हाळा तालुक्यात 29 रुग्णांची भर पडली. कागल तालुक्यात 39 नवे रुग्ण आढळून आले आहेत. चंदगडमध्ये 7 रुग्ण तर  आजर्‍यातही 7  रुग्ण आढळले. भुदरगडमध्ये  4 तर गगनबावड्यात एक रुग्ण आढळून आला.  

सकाळी 16 जणांची त्यानंतर 17, त्यानंतर 11 त्यापाठोपाठ 28 जणांचे अहवाल आहे. दुपारी 39 रुग्णांचे त्यानंतर 6, त्यानंतर 98, त्यानंतर 16, त्यानंतर 23, त्यापाठोपाठ 30 व 49 असे शासकीय प्रयोगशाळेतून अहवाल आले. एकाच खासगी लॅबमधून 100, दुसर्‍या लॅबमधून 7 तर तिसर्‍या लॅबमधून 353 असे रात्री 12 वाजेपर्यंत 793 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज दिवसभरात 183 जण कोरोनामुक्‍त झाले. त्यांना रुग्णालयात डिस्चार्ज दिल्याने कोरोनातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या 3 हजार 951 इतकी झाली. यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णालयासह कोरोना केअर सेंटर, खासगी रुग्णालय, घरी तसेच हॉटेल अशा ठिकाणी एकूण 5 हजार 255 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान निर्जंतुकीकरणासाठी शेंडा पार्कमधील कोरोना चाचणी बंद करण्यात आली होती आज पासून हे पूर्ववत सुरु करत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले.

खासगी लॅबद्वारे तपासणी सुरुच : मित्तल

शेंडा पार्क येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याने एक दिवस येथे होणारी चाचणी बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, खासगी प्रयोगशाळेत स्वॅबची तपासणी सुरु असल्याने अहवाल प्रलंबित नाहीत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले. आज 9 ऑगस्ट ऑगस्ट पासून शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत अहवाल तपासणीचे पूर्ववत काम सुरु होणार आहे. या ठिकाणी नवीन मशीन आणि किट आल्याने तेथील क्षमता दीड हजार चाचण्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे.

 "