Tue, Aug 11, 2020 22:21होमपेज › Kolhapur › ताराराणीच्या लेकी आक्रमक

ताराराणीच्या लेकी आक्रमक

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 10 2018 12:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दसरा चौक येथे भगव्या काळ्या रंगातील टी शर्ट, सलवार कुर्ती परिधान करत डोक्यावर भगवी पट्टी, टोपी घालून, हातात भगवा झेंडा घेऊन तरुणीने मोर्चाचे नेतृत्व केले. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत परिसर निनादून सोडला होता. खूप झाला मराठ्यांवर अन्याय, आता मिळवू न्याय, आम्ही भिक मागत नाही आमचा अधिकार मागतो आहे, राज्यकर्त्यांनो जागे व्हा, अशा घोषणा दिल्या गेल्या. मराठा आरक्षणाबाबत सरकार झोपेचे सोंग घेत आहे. समाज शांत असला तरी त्याच्यात बंड करण्याची धमक आहे. अशा तीव्र शब्दात मराठा मोर्चातील तरुणींनी सरकारला निर्वाणीचा इशारा देत आज मोर्चावेळी ताराराणीच्या लेकी आक्रमक झाल्या.

मावळ्यांचा उत्साह वाढवण्याकरिता लावण्यात आलेल्या स्फूर्तीगीतांवर महिला व तरुणींनी हातात भगवा ध्वज फिरवला. नगरसेविका निलोफर आजरेकर यांनीही यानिमित्त ध्वज फिरवत मराठा आरक्षण मोर्चाला पाठिंबा दर्शवला.

नातवंडांना तरी आरक्षण मिळू दे 

मुलांना  नाही नातवंडांना तरी नोकरी करताना पाहयची इच्छा आहे. गुणवत्ता असूनही अनेकदा शिक्षण आणि नोकरी क्षेेत्रात माघार घ्यावी लागते. मुलं-बाळं शिक्षणाने सधन झाली असली तरी त्यांना हव्या त्या क्षेत्रात क ाम करून प्रगती साधता येेत नाही. त्यांना आरक्षण मिळावे, त्यांची शैक्षणिक आर्थिक स्थिती अधिक सुधारावी, यासाठी आज सकाळपासून आंदोलनात सहभागी झाल्याची प्रतिक्रिया उचगावमधील साठ ते सत्तरीतील मालती जगदाळेे, शांताबाई पाटील, आक्‍काताई पाटील यांनी दिल्या.