Fri, Jul 10, 2020 03:16होमपेज › Kolhapur › ऊ स, काजूचे उत्पादन घटले

ऊ स, काजूचे उत्पादन घटले

Published On: Jun 06 2019 1:35AM | Last Updated: Jun 06 2019 12:13AM
वडकशिवाले ः सुनील दिवटे

ज्या काजू आणि ऊस पिकांनी आतापर्यंत शेतकर्‍यांना तारले त्याच पिकांच्या कमी उत्पादनामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण बिघडल्याचे चित्र आजरा तालुक्यात पाहायला मिळत आहे. निसर्गाची अवकृपा, पिकांवर पडणारे रोग आणि त्यामुळे उत्पादनात झालेली घट तसेच योग्य मिळत नसलेला दर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

काजू आणि ऊस ही तालुक्यातील शेतकर्‍यांच्या द़ृष्टीने महत्त्वाची पिके आहेत. गेल्या पाच-दहा वर्षांत चित्री व अन्य नद्या दुथडी वाहून जात असल्याकारणाने शेतकरी उसाच्या लागवडीकडे वळला आहे. चालू वर्षी सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. दिवसेंदिवस या पिकाच्या लागवडीत वाढच होत असल्याचे दिसते. 

पाण्याची मुबलकता, फारसे कष्ट न घेता मिळणारे उत्पादन, तुलनेने कमी लागत असलेले मनुष्यबळ यामुळे दिवसेंदिवस ऊस क्षेत्रात वाढ होत आहे. परंतु गेल्या वर्षी नदीकाठच्या पिकांवर हुमणी पिकाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी, हजारो एकरातील पीक हुमणीने फस्त केले आहे. त्यातच जून ते ऑगस्ट अखेर सतत पाऊस पडल्यााने पाणी तुंबून राहिले. त्यामुळे उसाची वाढ खुंटली. त्याचाही परिणाम मोठ्या प्रमाणात उसाच्या उत्पादनात घट येण्यावर झाला. 

दरवर्षीपेक्षा सरासरी 30 टक्के उत्पादनात घट आल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यातच तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानेही उत्पादनात घट आली. तर काही कारखान्यांची बिलेही शेतकर्‍यांना वेळेत मिळाली नाहीत. याचाही परिणाम शेतर्क?यांचे अर्थकारण बिघडण्यात झाला. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे उसाबरोबरच महत्त्वाचे असणारे काजू पीक यावर्षी आतबट्ट्यातच गेले आहे. मोहोर येण्याच्या कालावधीत धुक्याचे प्रमाण वाढले. परिणामी मोहोर करपून गेला. साहजिकच फळ लावण मोठ्या प्रमाणात कमी झाली. 

 गेल्या वर्षी शेतकर्‍यांनी सुमारे 45 कोटींची पीक कर्जे जिल्हा तसेच अन्य बँकांकडून घेतली होती. त्यांची 65 टक्केही परतफेड अद्याप झाली नसल्याचे तालुक्यातील चित्र आहे. त्यामुळे ही कर्जे कशी भागवायची, हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

दर खाली आल्याने शेतकरी चिंतेत
दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 60 टक्के  घट आल्याचे शेतकर्‍?यांचे मत आहे. मिळालेल्या उत्पादनालाही बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही. दर वर्षी प्रति किलो दीडशेच्या आसपास असणारा काजू दर सध्या केवळ एकशे पंधरा रुपये प्रतिकिलो इतका खाली आला आहे. बँकांची कर्जे कशी भागवायची व येणारा खरिपाचा हंगाम कसा साधायचा, या चिंतेत शेतकरी आहे.