होमपेज › Kolhapur › दीड महिन्यापासून झोन दाखले मिळणे बंद

दीड महिन्यापासून झोन दाखले मिळणे बंद

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 12:45AMकोल्हापूर : विजय पाटील

बांधकाम परवानगी किंवा जमीन बिगरशेती यासाठी मुख्य कागद म्हणून झोन दाखला आवश्यक असतो. खरेदी-विक्रीचा व्यवहार तर झोन दाखल्याशिवाय पुरा होत नाही. मागील दीड महिन्यापासून झोन दाखले देणे बंद झाल्याने खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झाले आहेत.कोणती जमीन कोणत्या प्रकारात मोडते हे झोन दाखल्यावरून (भाग दाखला) कळते. त्यामुळे झोन दाखला असेल तरच बांधकाम परवानगी दिली जाते. खरेदी-विक्री करताना संबंधित जागेचे मूल्यांकन करून शासनाकडे करभरणा करावा लागतो. त्यामुळे झोन दाखला असेल तर मूल्यांकन करणे सोपे जाते. रहिवासी, व्यापारी, शेती, बिगरशेती, पडीक आदी विविध जमीन प्रकारांचे वर्गीकरण झोन दाखल्यावरून स्पष्ट होते.

दाखला कधी मिळणार, असे विचारल्यावरही ठोस उत्तर दिले जात नाही. झोन दाखल्याचा अर्जही करू दिला जात नाही. मंजूर प्रादेशिक विकास आराखड्यानुसार भाग नकाशा अद्याप या कार्यालयाकडे प्राप्‍त झाला नसल्याने झोन दाखला दिला जात नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, आराखडा मंजूर होऊनही भाग नकाशा उपलब्ध का होऊ नये, याविषयी आश्‍चर्य व्यक्‍त होत आह

महिन्याला सातशेहून अधिक दाखले

महिन्याला सातशेहून अधिक झोन दाखले दिले जातात. हे प्रमाण अलीकडे वाढत चालले आहे. सध्या दाखले बंद असल्याने झोन दाखल्यासाठी गर्दी होणार आहे. यातून मार्ग काढून नियोजन केले नाही, तर लोकांची आणखी अडचण होणार आहे.