Tue, Jun 15, 2021 13:00होमपेज › Kolhapur › राज्यातील वीज थकबाकी 39 हजार कोटी

राज्यातील वीज थकबाकी 39 हजार कोटी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

म्हाकवे : डी. एच. पाटील

राज्यात वीज चोरी व शेतकर्‍यांची वीज बिले माफी मोर्चा आदीबाबत महावितरण चर्चेत असतानाच, राज्यातील वीज बिले थकबाकी तब्बल 39 हजार कोटी रुपये असल्याने कंपनीची आर्थिक कोंडी झाली आहे. मार्च अखेर जवळ असल्याने महावितरणने वसुली मोहीम जोरात सुरू केली आहे. 

महावितरण कंपनीच्या आर्थिक कोंडीमुळे वसुली मोहीम जोरात सुरू आहे. थकबाकीमध्ये 57 लाख 56 हजार घरगुती ग्राहकांकडे - 1 हजार 500 कोटी  5 लाख 73 हजार रुपये, वाणिज्य ग्राहकांकडे - 478 कोटी 1 लाख 5 हजार, उच्च व लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडे - 847 कोटी 41 हजार रुपये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे - 1 हजार 500 कोटी 79 हजार रुपये, पथदिवे ग्राहकांकडे - 3 हजार 300 कोटी 38 लाख रुपये, कृषी ग्राहकांकडे - 23 हजार कोटी 54 हजार 219 रुपये, यंत्रमाग ग्राहकांकडे - सुमारे 938 कोटी 57 हजार रुपये, इतर ग्राहकांकडे - 79 कोटी रुपयांचा समावेश आहे. 

राज्यातील 3 लाख 57 हजार कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकी ग्राहकांकडे 7 हजार कोटींची थकबाकी आहे. प्रत्येक महिन्यात ग्राहकांकडून येणार्‍या महसुलापैकी सुमारे 85 ते 90 टक्के खर्च वीज खरेदीवर होत आहे. प्रत्येक महिन्यात अनेकजण वीज बिल भरत नसल्याने वीज खरेदीसाठी लागणारी रक्‍कम भरताना कंपनीला नाकी नऊ झाले आहे. महावितरणकडून देण्यात येणारे प्रतिमहिन्याला बिल बरेच ग्राहक भरत नाहीत. त्यामुळे थकबाकी फुगत आहे. थकबाकीत घरगुती ग्राहकांबरोबरच औद्योगिक थकबाकी आहे. आर्थिक मंदीमुळे सर्वच व्यापार्‍यांवर परिणाम होत आहे. ग्राहकांच्या सेवेच्या द‍ृष्टीने आवश्यक असलेल्या दैनंदिन संचलनासह देखभाल-दुरुस्तीबाबतही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यातील 1 कोटी 41 लाख ग्राहकांकडे असणारी 39 हजार कोटी रुपये वसुली करण्याचे आव्हान कंपनीसमोर आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, States, outstanding, power, balance, 39 thousand crores


  •