Thu, Sep 24, 2020 16:16होमपेज › Kolhapur › टोमॅटो एफ.एम.वर विशेष मुलाखत

फडणवीस दाम्पत्याच्या नात्याचे उलगडले पैलू

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 21 2017 1:53AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

एक सामान्य माणूस म्हणून राज्यातील प्रत्येकाच्या मनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्याविषयी कुतूहल आहे. 94.3 टोमॅटो एफ.एम.च्या ‘दिल से...’ या कार्यक्रमात मेड फॉर इच अदर या सेगमेंटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची विशेष मुलाखत घेण्यात आली असून, त्यामध्ये फडणवीस दाम्पत्याच्या नात्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आर.जे. रसिका हिने ही मुलाखत घेतली असून, त्यात फडणवीस पती-पत्नींनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या पलीकडे वैयक्‍तिक जीवनातील अनेक सिक्रेटस् पहिल्यांदाच शेअर केली आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय, सामाजिक व्यक्‍ती म्हणून कसे आहेत, हे आपण पाहिले आहे; पण ते एक लाईफ पार्टनर म्हणून कसे आहेत? हे त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीच या मुलाखतीत सांगितले आहे. 

लग्‍न कसे ठरले? पहिली भेट कोठे झाली? गिफ्ट कोणी कोणाला दिले? दोघांनी मिळून पाहिलेले स्वप्न कोणते? या आणि अशा अनेक प्रश्‍नांची दिलखुलास उत्तरे फडणवीस दाम्पत्याने दिली आहेत. सध्याच्या बिझी शेड्युलमध्ये दोघे एकमेकांना कसा वेळ देतात, या विषयीचीही उत्सुकता या मुलाखतीतून दूर झाली आहे. 

94.3 टोमॅटो एफ.एम.च्या कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव आणि कोकण भागात ही मुलाखत ऐकण्यात आली. ज्यांना ही मुलाखत ऐकण्याची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी पुढारी वृत्त समूहाच्या www.pudhari.com या वेबसाईटवर ही मुलाखत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिस्टर अँड मिसेस फडणवीस यांच्याबरोबरच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे खा. धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील, आ. डॉ. सुजित मिणचेकर, आ. राजेश क्षीरसागर, आ. अमल महाडिक, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांच्या सपत्निक मुलाखतीही  www.pudhari.com या वेबसाईटवर ऐकायला मिळणार आहेत. यापुढेही विविध मान्यवर दाम्पत्याच्या मुलाखती  www.pudhari.com वर ऐकायला मिळणार आहेत.