Fri, May 07, 2021 17:49
पालकमंत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय : शौमीका महाडिक 

Last Updated: May 04 2021 4:23PM

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून, त्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. अशातच उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर झाला आहे. या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ट्विट करून जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे. 

शौमिका महाडिक यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, कोरोना वाढलाय निवडणूक नको अशी भूमिका आम्ही घेत होतो; तेव्हा हट्ट केला आणि आता गोकुळ निवडणूक झाल्यावर मग लॉकडाऊन अशी भूमिका घेणाऱ्या पालकमंत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय. तेव्हा माणसं मरत नव्हती का? कोल्हापूर ही गोष्ट कधीही विसरणार नाही, अशा शब्दात शौमिका महाडिक यांनी मंत्री सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.