Thu, Jul 02, 2020 12:35होमपेज › Kolhapur › युतीच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या कोल्हापुरातून

युतीच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या कोल्हापुरातून

Published On: Mar 23 2019 5:02PM | Last Updated: Mar 23 2019 5:02PM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युतीच्या प्रचाराचा धुरळा कोल्हापुरातून उडणार आहे. युतीच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने होणार आहे. रविवारी (ता.२४) सायंकाळी ५.०० वाजता कोल्हापुरातील तपोवन मैदानावर होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर आज (ता. २३) आ. राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सभेच्या स्थळाची पाहणी केली. 

तपोवन मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून, मैदानावर व सभा मार्गावर भगवे झेंडे लावण्यात येत आहेत. यासह मैदानावर सुमारे भव्यदिव्य व्यासपिठ उभारण्यात आले आहे. यासह २ लाख नागरिक बसतील अशी बैठक व्यवस्था, ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात आले आहेत. 

युतीची होणारी ही पहिलच सभा न भूतो न भविष्यात: करण्याचा चंगच शिवसेना भाजप युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांधला असून, कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाप्रमाने पदाधिकार्यांचे मेळावे घेण्यात आले आहे.  शिवसेना भाजप युतीचे मंत्री आणि पदाधिकारी या सभेस संबोधित करणार आहेत. 

कोल्हापूर दौऱ्याकरिता शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे दुपारी दोन वाजता मुंबई येथून प्रयाण होणार आहे. दुपारी तीन वाजता त्यांचे कोल्हापूर येथील राजाराम महाराज विमानतळ येथे आगमन होणार आहे. याठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर ते हॉटेल सयाजी येथे काहीवेळ राखीव ठेवण्यात आला आहे. दुपारी ५ वाजता ते दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आई अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायं. ६ वाजता तपोवन येथील जाहीर सभेसाठी प्रस्थान करणार आहेत.