Sat, Feb 29, 2020 00:01होमपेज › Kolhapur › शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांचे अंबाबाईस साकडे(video)

शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांचे अंबाबाईस साकडे(video)

Published On: Jun 06 2019 3:25PM | Last Updated: Jun 06 2019 6:09PM
कोल्‍हापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्‍या घवघवीत यशानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांनी केंद्रीयमंत्री अरविंद सावंत आणि नवोदीत खासदारांसह करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेउन लोकसभा निवडणुकीत केलेले नवस फेडले. यावेळी नवाेदीत खासदारांसह आमदार शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळो अशी प्रार्थना केली. दरम्‍यान महाराष्‍ट्र कर्नाटक सीमा प्रश्‍नासंदर्भात सीमावासियांनी ठाकरे यांच्‍यासमोर जोरदार घोषणाबाजी करुन ठाकरे यांचे लक्ष वेधले.

शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे, रश्‍मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांचे दुपारी एकच्‍या दरम्‍यान करवीर निवासिनीय अंबाबाई मंदिरात आगमन झाले. तत्‍पूर्वी नवोदीत खासदारांचे गरुड मंडपात आगमन झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे कुटुंबीयांसह नवोदीत खासदारांची भेट घेउन स्‍वागत केले. पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान समितीतर्फे उध्‍दव ठाकरे,नवोदीत खासदारांचा पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान समितीचे अध्‍यक्ष महेश जाधव यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. केद्रीय मंत्री अरविंद सावंत, खासदार सर्वश्री गजानन किर्तीकर, ओमराजे निंबाळकर, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, प्रतापराव जाधव, राजन विचारे, विनायक राउत धैर्यशील माने, प्रा. संजय मंडलिक यांनी उध्‍दव ठाकरे यांच्‍यासोबत अंबाबाईचे दर्शन घेतले. अंबाबाईचे दर्शन घेतल्‍यानंतर ठाकरे यांनी मातृलिंगाचे दर्शन घेतले. त्‍यानंतर मंदीर परिसरात प्रदक्षिणा घातली.

यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, उल्‍हास पाटील, सत्‍यजित पाटील सरुडकर, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबीटकर, शिवसेना जिल्‍हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव, शहर प्रमुख शिवाजी जाधव, हर्षल सुर्वे, सुजित चव्‍हाण, दुर्गेस लिंग्रस, देवस्‍थान समितीचे सचिव विजय पोवार,  संगिता खाडे, खजानिस वैशाली क्षीरसागर, व्‍यवस्‍थापक धनाजी जाधव, माजी खासदार निवेदीता माने, नगसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, परिवहन सभापती अभिजित चव्‍हाण, नियाज खान, प्रकाश सरनाईक, किशोर घाडगे, विशाल देवकुळे, शशिकांत जाधव, मंगल साळोखे, कपिल सरनाईक आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे कोल्‍हापूर दौर्‍यावर येणार असल्‍याने संपूर्ण जिल्‍ह्यातील शिवसैनिकांनी आणि पदाधिकार्‍यांनी करवीरनिवासीनी अंबाबाई मंदिरात गर्दी केली होती. त्‍यांना भेटण्‍यासाठी चढाओढ सुरु होती. अनेकांनी जवळ पोहचून त्‍यांच्‍यासोबत आवर्जुन सेल्‍फी काढला. कार्यकत्यार्त्यांच्‍या आणि नागरिकांच्‍या गर्दीमुळे पोलिस यंत्रणेची मात्र चांगलीच दमछाक झाली. सुमारे पाउण तासानंतर ठाकरे यांनी अंबाबाई मंदिरातून प्रयाण केले.

खासदारांचे गरुड मंडपात वेटींग

उध्‍दव ठाकरे यांचे आगमन वेळेवर होईल म्‍हणून अनेक खासदारांनी सकाळी दहाच्‍या सुमारास गरुड मंडपात हजेरी लावली. मात्र ढगाळ वातावरणामुळे ठाकरे यांना उशिरा झाल्‍याने खासदारांना गरुड मंडपात वेटींग करावे लागले.

सीमावासियांचे गार्‍हाणे

दरम्‍यान सीमावासियांच्‍या शिष्‍टमंडळाने ठाकरे यांची भेट घेउन सीमाप्रश्‍न सोडविण्‍याची मागणी केली. शिष्‍टमंडळात माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्‍लेदार, पंढरी परब, महाराष्‍ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे, राजू बिरजे, मनोहर हलगेकर, विजय भोसले, मोहन बहादुरगे, सुधा भातखांडे, दशरथ गावडे, कल्‍लापा पाटील, किरण बडवाळाचे, मुरलीधर पाटील, जयराम देसाई, विवेक गीरी, प्रकाश चव्‍हाण, लक्ष्‍मणराव कसरलेकर, यशवंत बिरजे, महादेव घाडी, विठ्‍ठलराव गुरव, विलास बेळगांवकर, अनिल पाटील, अविनाश पाटील, प्रविण पाटील, आबासाहेब दळवी, बाळासाहेब शेलार आदींचा समावेश हाेता.