Fri, Feb 28, 2020 23:05होमपेज › Kolhapur › शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्या

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्या

Last Updated: Nov 26 2019 12:26AM

कागल : शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करावा, या मागणीसाठी कागल तहसील कार्यालयावर शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी माजी आ. संजय घाटगे, जि. प. सदस्य अमरिशसिंह घाटगे यांच्यासह शिवसैनिकागल ः प्रतिनिधी
महापुरासह अवकाळी पावसाने घातेलेले थैमान शेतकर्‍यांसाठी मारक ठरले आहे. शासनाने अजूनही पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी योग्य मदत दिली नाही. याविरोधात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना 25 हजारांची हेक्टरी मदत द्यावी, या मागणीसाठी सोमवार (दि. 25) रोजी जिल्ह्यातील कागल, भुदरगड, राधानगरी तहसील कार्यालयांवर शिवसेनेतर्फेे मोर्चा आला. विविध मागण्याचे निवेदन तहसीलदारांना   देण्यात आले.

शिवसेनाच शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करू शकते ः संजय घाटगे
भाजपने सत्ता स्थापनेचा केलेला दावा अनाकलनीय आहे. शेतकर्‍यांचा सात-बारा खर्‍या अर्थाने शिवसेनाच कोरा करू शकते. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आ. संजय घाटगे यांनी केले.शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी व्हावी. तसेच, विविध मागण्यांसाठी कागल तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते.  

घाटगे  पुढे म्हणाले, अवकाळी पावसाने शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांनी मानाखाली टाकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना जगण्यासाठी कर्जमाफीशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे म्हणाले, शिवसेना पक्ष प्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकर्‍यांना कर्जमाफी झालीच पाहिजे त्यासाठी रस्त्यावर उतरू, मात्र शिवसेना शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले. मोर्चात जि.प.चे शिक्षण सभापती अंबरीशसिंह घाटगे, धनराज घाटगे,  अशोक पाटील, शिवगोंड पाटील,  सौ. संज्योती माळवीकर, सौ. विद्या गिरी, राजेंद्र येजरे, विलास चव्हाण, अरुण तोडकर, बाबुराव शेवाळे, संदीप पाटील, सौ. कांचन माने, सीमा गोरे,  दीपाली घोरपडे, नेत्राली दंडवते, बाळासाहेब पाटील, दिनकर लगारे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकर्‍यांची वीज बिले माफ करा
गारगोटी : प्रतिनिधी
भुदरगड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, वीज बिले माफ करावी. यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रा. अर्जुन आबिटकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

महापूर व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्यावी. मोटरपंपांची वीज बिले माफ करावी, एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, शेतकरी व शेतमजूरांना पेन्शन द्यावी.

अतिवृष्टी,  महापूर व अवकाळी पावसामुळे झालेली पिकांची नुकसानभरपाई त्वरित खात्यावर जमा करावी,  जिल्ह्यातील 41 हजार 700 घरे बांधून द्यावीत यासह विविध मागण्यांसाठी भुदरगड तहसीवर मोर्चा काढण्यात आला. 

आ. प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयापासून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा हुतात्मा चौकात दाखल झाल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन देण्यात आले. 

मोर्चात तालुका प्रमुख अविनाश शिंदे, दत्तात्रय उगले, नंदकुमार ढेंगे, अंकुश चव्हाण, युवक नेते यशवंत नांदेकर, संदीप वरंडेकर, धनाजी खोत, अजित चौगले, रणधीर शिंदे, संग्राम सावंत, अशोक पाटील, महिला संघटक रंजना आंबेकर,  युवा सेना शहराध्यक्ष रफीक मुल्ला, प्रवीण चव्हाण, अजित देसाई आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हेक्टरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी 
राधानगरी : प्रतिनिधी
अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना एकरी पंचवीस हजार रुपये द्यावे, शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करावा व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासह इतर मागण्यांचे निवेदन राधानगरी तालुका शिवसेनेतर्फे  तहसीलदार मीना निंबाळकर यांना देण्यात आले.

 तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिके वाया गेली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.  त्यातच  जनावरांची चाराही कुजल्यामुळे चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकर्‍याला चार पैसे मिळवून देणारा दुधाचा व्यवसायही अडचणीत आला आहे. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकर्‍यांना एकरी पंचवीस हजार रुपये द्यावे, शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करावा, 2019 सालातील पीक कर्जांना माफी द्यावी.

प्रधानमंत्री किसन सन्मान योजनेतील अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावे,  खते व बियाणे खरेदीसाठी केंद्र शासनाने शंभर टक्के अनुदान द्यावे, शेती पंपाची वीज माफ करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे  केल्या आहेत.

यावेळी तालुकाप्रमुख उत्तम पाटील, भिकाजी हळदकर, के. के. राजिगरे, बापू किल्लेदार, भिकाजी तोडकर, निशांत पोवार, महादेव पाटील, प्रसाद डवर,  निखिल आंबेकर, युवराज पाटील, सरदार सरावने, मारुती चौगले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.