Thu, Sep 24, 2020 11:03होमपेज › Kolhapur › संजय घोडावत भारतातील पहिले उद्योगपती वैमानिक

संजय घोडावत भारतातील पहिले उद्योगपती वैमानिक

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते सत्यात उतरविणारे प्रसिद्ध उद्योगपती, संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत हे नुकतेच  फिक्स्ड विंग एरप्लेन या  परीक्षेत विशेष प्रावीण्यासह पास झाले आहेत. स्वतःचे   हेलिकॉप्टर व विमान चालविणारे भारतातातील ते पहिले उद्योगपती आहेत.

घोडावत हे नोहेंबर 2016 साली हेलिकॉप्टर प्रायव्हेट पायलट लायसन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याअगोदर त्यांनी चार वेळा ही परीक्षा दिली होती परंतु त्यांना त्या परीक्षेत अपयश आले होते. अपयशाने खचून न जाता त्यांनी नोव्हेंबर 2016 च्या पायलट परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले. यानंतर ते पुढे 2017 मध्ये हेलिकॉप्टरचे आंतरराष्ट्रीय पायलट लायसन्स ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे गेले. तिथे ट्रेनिंग कालावधीमध्ये  55  तासांची हवाई सफर यशस्वीरित्या पूर्ण करून फ्लयिंग टेस्टमध्ये त्यांनी 83% गुण संपादन केले. घोडावत यांनी  2018  मध्ये 55 तासांची हवाई सफर व  विमान पायलट ट्रेनिंग पूर्ण करून पायलट परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविले आहे.

घोडावत म्हणाले,  अपयश आले म्हणून खचून न जाता प्रत्येक कठीण प्रसंगावर  मात केली पाहिजे. आयुष्यात विद्यार्थ्यांनी  सतत काहीतरी शिकण्याची जिद्द जोपासावी व ती गोष्ट सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी, यशस्वी होण्यासाठी कोणताच शॉर्टकट नाही, हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. माझ्या यशाचे श्रेय ग्रुपमधील प्रत्येक घटकाला जाते. आई-वडील, थोरामोठ्यांचे आशीर्वाद, हितचिंतकांच्या शुभेच्छा याच्या जोरावरच मी सफल झालो आहे.