होमपेज › Kolhapur › 303 शाळांचा निकाल 100 टक्के

303 शाळांचा निकाल 100 टक्के

Published On: Jun 09 2019 1:24AM | Last Updated: Jun 09 2019 12:24AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर विभागातील 303 शाळांनी दहावीच्या निकालात ‘शत-प्रतिशत’ कामगिरी करीत यश संपादन केले आहे. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. दुसरीकडे, निकालाची विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता अन् धाकधूक दिसून आली.

दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. सकाळपासूनच निकाल पाहण्यासाठी नेटकॅफेंवर विद्यार्थी, पालकांची गर्दी होती. एक वाजता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल पाहिला. त्यानंतर मोबाईलवरून पालकांना कळविले. मित्रांना शुभेच्छापर संदेश पाठविले. दहावीत उत्तीर्ण झाल्यावर काही कुटुंबांत मुलांचे औक्षण करून पेढे वाटप करण्यात आले. दिवसभर सोशल मीडियावर निकाल व्हायरल होत होता.

दहावीच्या निकालात विभागातील 303 शाळा शंभर टक्क्यांवर आहेत. 670 शाळा (90 ते 99), 703 शाळा (80 ते 90), 357 शाळा (70 ते 80), 123 शाळा (60 ते 70), 44 शाळा (50 ते 60), 39 शाळा (40 ते 50), 15 शाळा (30 ते 40), 6 शाळा (20 ते 30), 5 शाळा (10 ते 20) आणि 0 ते 10 टक्क्यांमधील 2 शाळा आहेत.

रिक्षामामांच्या मुलीने केली ‘आकांक्षा’ पूर्ण

वडील रिक्षाचालक... आई गृहिणी... घरी शैक्षणिक वातावरणाचा पत्ताही नाही. आई-वडिलांचा जीवन संघर्ष जवळून पाहणार्‍या आकांक्षा आरसेकर हिने खडतर परिश्रम व जिद्दीच्?या जोरावर दहावी परीक्षेत 97 टक्के गुण संपादन करून घवघवीत यश संपादन केले. 

मुक्‍त सैनिक वसाहत येथील महेश आरसेकर हे रिक्षा व्यावसायिक आहेत. त्यांची मोठी मुलगी आकांक्षा हिच्?या आजी कै. आशा मोरे या शिक्षिका होत्?या. त्यांच्याकडून तिने शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवला. महावीर इंग्लिश स्कूलमध्ये तिचे शिक्षण सुरू झाले. आजीकडून मिळालेल्या संस्कारांतून ती इयत्ता पहिलीपासून वर्गात पहिल्?या क्रमांकाने पास होत आली. तिच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी तिच्या आई-वडिलांनी शाळेजवळ साळोखेनगरात भाड्याने खोली घेतली. दहावीच्या बदललेल्या नव्या अभ्यासक्रमामुळे तिला थोडे टेन्शन आले होते. घरात वडिलांना, आईला इंग्रजीचा तितकासा गंध नसल्याने अभ्यासातील शंका दूर करताना तिला शिक्षक अथवा मैत्रिणींच्या मदतीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मात्र, तिच्या डोक्?यात आजीचे एक वाक्?यच घुमायचे ते म्हणजे ‘अशू, शाळेच्या बोर्डावर नाव येईल इतके गुण मिळव बस्स.’ या प्रेरणेने ती अभ्?यास करत गेली. अखेर तिने दहावीच्या परीक्षेत तब्बल 97.20 टक्के गुण मिळवत घरच्?यांचा विश्?वास सार्थ ठरवला.  

दहावीत पास; पण प्रणव आयुष्याच्या परीक्षेत नापास!

दहावीचे पेपर अवघड गेल्याच्या नैराश्यातून आर.के.नगरातील प्रणव सुनील जरग (वय 16) या विद्यार्थ्याने गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, प्रत्यक्षात शनिवारी जाहीर झालेल्या एसएससी बोर्डाच्या निकालामध्ये तो 42 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला. केवळ अन् केवळ नापास होण्?याच्?या भीतीपोटी त्?याने मृत्?यूला कवटाळले. ऑनलाईन निकाल पाहताना त्?याचा मित्र परिवारही आज सुन्?न झाला होता. 

जरग कुटुंबीय मूळचे करवीर तालुक्?यातील महे गावचे रहिवासी. कामानिमित्त 1985 पासून ते आर.के.नगरात स्?थायिक झाले. प्रणवचे आजोबा प्रसिद्ध बांधकाम व्?यावसायिक व नावाजलेले होते. त्?यांच्?यानंतर मुलांनीही बांधकाम व्?यवसायात जम बसविला होता. सुनील जरग हे बांधकाम व्?यवसायासोबत केबलचा व्?यवसाय चालवितात. त्?यांचा थोरला मुलगा प्रणव. प्रणव आर.के.नगरातील देशभक्?त रत्?नाप्?पाण्?णा कुंभार विद्यालयात शिकत होता. दहावीच्?या परीक्षेचा अभ्?यास त्?याने चांगला केला होता; पण जसजसा निकाल जवळ आला तसतसा तो नैराश्?यात गेला. गेले काही दिवस तो इंग्रजी विषयात नापास होण्?याची भीती व्?यक्?त करत होता. तरीही कुटुंबीयांनी त्?याच्?यावर कोणताही दबाव टाकला नाही. नापास झालास तरी व्?यवसाय सांभाळ, असे वडील त्?याला धीर देत होते; पण प्रणव मनातून खूपच खचला होता. गुरुवारी सायंकाळी घरात कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने कुटुंबीयांना व मित्र परिवाराला मोठा मानसिक धक्?का बसला. 

शनिवारी बोर्डाचा निकाल जाहीर होताच मित्र परिवाराला प्रणव पास झाल्?याचे समजले. इंग्रजी विषयात त्?याला 37 गुण प्राप्?त झाले आहेत; पण त्?याच्?या कुटुंबीयांना कळवायचे तरी कसे, अशी रुखरुख प्रणवच्?या मित्रांना लागली होती. प्रणवच्?या घरी धीर गंभीर वातावरण आहे. प्रणव आत्ता असायला हवा होता इतकीच काय ती भाबडी आशा त्?याच्?या घरचे देवाकडे व्?यक्?त करत आहेत. 

आईचे कष्ट शिवप्रसादने लावले सार्थकी

सातवीत असताना वडिलांचे छत्र हरवले. आई धुणी-भांडी करते. भाड्याच्या एका खोलीत घराचा संसार अशा कठीण परिस्थितीतही शिवप्रसादने दहावीला 93.40 टक्के गुण मिळवले. त्याची 21 व्या वर्षी आयएएस होण्याची जिद्द आहे.

दहावीचा निकाल लागताच आपण आईचे कष्ट सार्थ ठरविल्याची भावना शिवप्रसादने व्यक्‍त केली. तो महाराष्ट्र हायस्कूलचा विद्यार्थी आहे. दहावीला शाळेत तो तिसरा आला. नेहरूनगरमध्ये भाड्याच्या घरात एका खोलीतच शिवप्रसाद बसय्या मुगडलीमठ व त्याचे कुटुंब राहते. मूळचे बेळगावचे हे कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात आले. शिवप्रसादचे वडील सेंट्रिंग कामगार होते. त्यांच्या अकाली निधनानंतर शिवप्रसादवर आभाळ कोसळले. त्यातूनही त्याने न डगमगता गेली पाच वर्षे प्रत्येक इयत्तेत 90 टक्क्यांहून अधिक गुण दरवर्षी मिळवत यशाचा आलेख चढताच ठेवला आहे. त्याची आई गीता यांनी धुणी-भांडी करीत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आतापर्यंत पेलली आहे. 

शिवप्रसादला लहान बहीण आहे. ती सातवी इयत्तेत शिकते. दहावीची परीक्षा झाल्यावर त्याने कोल्ड्रिंग हाऊसमध्ये नोकरीही केली. पुढे काय करणार? असे विचारले असता त्याने इंग्रजी माध्यमातून कला शाखेचे शिक्षण घ्यावयाचे आहे. व यूपीएससीचा अभ्यास करावयाचा आहे, असे दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

गवंड्याच्या मुलीची परिस्थितीवर मात

अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून कोणताही क्लास न लावता फक्‍त शाळेच्या अभ्यासावर आणि स्वतःच्या मेहनतीवर गवंड्याच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत 91.40 टक्के गुण मिळविले. नम—, गुणी आणि हुशार अशी ओळख निर्माण केलेल्या सोनू चंद्रकांत गोरल हिने हे यश संपादन केले असून, ती उषाराजे हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबर समूहगीत स्पर्धेतदेखील राष्ट्रीय स्पर्धेत सोनूने विशेष यश संपादन केले आहे. सोनूचे वडील चंद्रकांत गोरल हे गवंडी काम करतात. त्यांना दोन मुली व एक दिव्यांग मुलगा आहे. घरची परिस्थिती तशी बेताचीच असून, गोरल कुटुंबीय भाड्याच्या घरात राहतात. या परिस्थितीची जाणीव सोनूला आहे. नियमित अभ्यास, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून सोनूला शासकीय अधिकारी व्हायचे आहे.