एस. पी. एंटरप्राईझेसचा दाभोळकर कॉर्नरला प्रारंभ

Published On: Jun 07 2019 1:49AM | Last Updated: Jun 07 2019 1:00AM
Responsive image


कोल्हापूर : उद्योग, व्यवसायांसह विविध प्रकारच्या कर्जपुरवठा करणार्‍या एस. पी. एंटरप्राईझेसचा प्रारंभ गुरुवारी महापौर सौ. सरिता मोरे, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष आणि दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, सिनेअभिनेते सचिन पिळगावकर आणि टीव्ही मालिका अभिनेत्री अनिता दाते यांच्या हस्ते झाला.

दाभोळकर  कॉर्नर येथे सुरू झालेल्या या कार्यालयात विविध प्रकारचे कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याप्रसंगी हुपरीच्या नगराध्यक्षा सौ. जयश्री गाठ, ‘माझ्या नवर्‍याची बायको’ मालिकेतील राधिका सुभेदार फेम अनिता दाते, अजितसिंह काटकर आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

एस. पी. एंटरप्राईझेस ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर सचिन बामगुडे, डायरेक्टर शिवराज  बडिगेर, अनिल दळवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.