Mon, Jun 01, 2020 04:08होमपेज › Kolhapur › 'जन -धन'मधील पैसे काढण्यासाठी 'असे' आहे वेळापत्रक 

'जन -धन'मधील पैसे काढण्यासाठी 'असे' आहे वेळापत्रक 

Last Updated: Apr 02 2020 7:44PM

file photoकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

प्रधानमंत्री जन धन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यांवर पुढील तीन महिने (एप्रिल, मे आणि जून २०२०) प्रती महिना रुपये पाचशे इतकी रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जमा करण्यात येणार आहे. यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम २ एप्रिल २०२० रोजी सर्व संबंधित बँकांकडे सरकारकडून वर्ग करण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ साथीमुळे बँक शाखांमध्ये आणि ग्राहक सेवा केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने पुढीलप्रमाणे दिवस आणि वेळापत्रक आखून दिले आहे. त्याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहूल माने यांनी केले आहे.

दिवस पहिला : ३ एप्रिल २०२०

ज्या खाते क्रमांकांचा शेवट ० किंवा १ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.

 दिवस दुसरा : ४ एप्रिल २०२०
खाते क्रमांकांचा शेवट २ किंवा ३ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.
५ तारखेला रविवार आणि ६ एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी असल्यामुळे व्यवहार बंद राहतील.


 दिवस तिसरा- ७ एप्रिल २०२०
ज्या खाते क्रमांकांचा शेवट ४ किंवा ५ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. 

 दिवस चौथा : ८ एप्रिल २०२०
ज्या खाते क्रमांकांचा शेवट ६ किंवा ७ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.  

दिवस पाचवा - ९ एप्रिल २०२० 
ज्या खाते क्रमांकांचा शेवट ८ किंवा ९ ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.