Tue, Sep 22, 2020 08:54होमपेज › Kolhapur › कोल्हापूरसाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा

कोल्हापूरसाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा

Last Updated: Jul 03 2020 3:30PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोरोनाशी लढा देण्यासाठी व्हेंटीलेटर आणि आरोग्य विषयक बाबींसाठी ५ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. याचबरोबर संभाव्य पूर परिस्थीतीवर मात करण्यासाठी रिमोटवर आधारित यू बोट आणि ४० एचपी क्षमतेच्या २५ बोटी उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (ता.३) केली. शासकीय विश्रामगृह येथे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संभाव्य पूर परिस्थिती, कोरोना साथ रोग प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

अधिक वाचा :  महाराष्ट्रात कोरोनाचा जोर सप्टेंबरपर्यंत कमी होईल : डॉ. तात्याराव लहाने (Video)

मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार म्हणाले कि, कोविडच्या फार मोठ्या संकटाला थोपविण्याचे काम जिल्ह्याने केले आहे. कोरोना लढ्यातील योद्धे अभिनंदनास पात्र आहेत. मृत्यूदर १.६ टक्के इतका असून, रुग्ण संख्या बरी होण्याच्या प्रमाणात राज्यात आघाडीवर आहे. इचलकरंजी येथील आयजीएमसह कोविड काळजी, कोविड आरोग्य केंद्रांसाठी व्हेंटीलेटर, ऑक्सिजनची सुविधा आणि अनुषंगिक आरोग्य बाबींचा समावेश असणारा प्रस्ताव वैद्यकीय अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एकत्रित पाठवावा. तसेच २८ प्रकारची एकत्रित चाचणी करणारी किऑस्कची माहिती घ्या असे ते म्हणाले.

अधिक वाचा : ई-पास देणार्‍या दोन एजंटांवर कारवाई

खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी कमी करण्याची मागणी केली. आमदार चंद्रकांत जाधव, प्रकाश आवाडे आणि ऋतुराज पाटील यांनी उद्योग व्यवसायांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या प्रशिक्षणावर भर देणेबाबत तसेच उद्योगांच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. आमदार राजूबाबा आवळे आणि खासदार धैर्यशील माने यांनी नुकसान झालेल्या गावात भरपाई देण्याची मागणी केली.

बैठकीस महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.

 "