Thu, Jun 24, 2021 12:05होमपेज › Kolhapur › गारगोटी : लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर बलात्कार

गारगोटी : लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर बलात्कार

Last Updated: Jul 19 2020 7:46PM

संग्रहित छायाचित्रगारगोटी : पुढारी वृत्तसेवा

मडिलगे बुद्रुक येथे युवकाने युवतीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची फिर्याद पीडित युवतीने पोलिसांमध्ये दिली आहे. याप्रकरणी मडिलगे बुद्रुक येथील सागर भास्कर बकरे व वडील भास्कर बकरे यांच्याविरोधात भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीस शनिवारी रात्री अटक केली.

मडिलगे येथील युवक व कोल्हापूर येथील युवतीची फेसबुकवरून ओळख झाली. दोघेही पुण्याला शिकत होते. यातून युवकाने युवतीला फुस लावून 17 डिसेंबर 2015 रोजी बोलावून घेऊन मडिलगे बुद्रुक येथील घरी युवतीशी जबरदस्तीने शारीरीक सबंध ठेवले. मार्च 2016 मध्ये युवकाने युवतीस नृसिंहवाडी येथे नेऊन गळ्यात मंगळसूत्र बांधून स्टॅम्प पेपरवर सही घेतली. तसेच युवकाने शारीरीक सबंधाचे फोटो काढून फेसबुकवर टाकून बदनामी करणार अशी धमकी देऊन 1 मार्च 2020 रोजी वेळोवेळी शारीरीक सबंध ठेवले असल्याची फिर्याद सबंधीत युवतीने पोलीसात दाखल केली आहे.

सागर बकरेस पोलिसानी शनिवारी रात्री उशीरा अटक केली. त्यास व्हिसीद्वारे न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अमित देशमुख करीत आहेत.