Wed, Jul 08, 2020 09:22होमपेज › Kolhapur › 'शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांना जाब विचारा' (video)

'शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांना जाब विचारा' (video)

Published On: Jul 15 2019 2:34PM | Last Updated: Jul 15 2019 2:53PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाइन

पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांबरोबर राज्य आणि केंद्र सरकारची तिजोरी लुटण्याचे काम सुरू केले आहे. परंतु आज जे सत्तेत आहेत तेच पीक विमा कंपन्यावर मोर्चा काढण्याची भाषा करत आहेत. जर खरच शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांना जाब विचारावा, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. 

आता जे सरकारमध्ये आहेत त्यांनी पीक विमा कंपन्यांबरोबर काय करार केला आहे तो तपासून पहावा. हा करार कसा झाला याचा जाब पक्षातील मंत्र्यांना विचारावा, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 

यावेळी शेट्टी म्हणाले, एका बाजूला सत्तेचा उपभोग घ्यायचा दुसऱ्या बाजूला आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असा बनाव करायचा ही नाटके महाराष्ट्राला कळाली आहेत. जर खरच तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना जाब विचारावा, असा सवाल माजी खासदार शेट्टी यांनी केला आहे.