Mon, Jun 01, 2020 04:38होमपेज › Kolhapur › दहा मटका अड्ड्यांवर छापे; ९ जण ताब्यात

दहा मटका अड्ड्यांवर छापे; ९ जण ताब्यात

Published On: Dec 02 2017 1:08AM | Last Updated: Dec 02 2017 12:51AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी सायंकाळी शहरातील 10 मटका अड्ड्यांवर छापे टाकून रोख 35 हजार रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्‍त केले. याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून मटका बुकींसह 13 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली.

रायगड कॉलनी परिसरात मटका घेणार्‍या अमर सुनील सातवेकर (वय 26, रा. शिवनेरी कॉलनी, पाचगाव) व जयदीप सदानंद सरवदे (36, रा. पाचगाव) या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख 6000 रुपये व मटक्याचे साहित्य जप्‍त करण्यात आले. उत्तम फडतारे याच्यासाठी ते मटका घेत होते.

राजारामपुरीतील शाहूनगरात अमर तानाजी पोवार (35, रा. दौलतनगर), जुना कंदलगाव रस्त्यालगत सागर प्रभुदास व्हटकर (36, जवाहरनगर) व शंकर गंगाराम कदम (54, रा. जवाहरनगर) यांना ताब्यात घेऊन रोख रक्‍कम जप्‍त करण्यात आली. तिघे बबन कवाळे व राहुल पाटील यांच्यासाठी मटका घेत होते.

राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका घेणारे सचिन लक्ष्मण परबाळे (38, रा. शनिवार पेठ), श्रीपती पांडुरंग काशीद (45, रा. रामानंदनगर, खंडोबा मंदिरलगत) यांना पकडून रोख 17 हजार जप्‍त करण्यात आले. दोघे राजू बन्‍ने याच्यासाठी मटका घेत होते.

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिद्धू पांडुरंग सावंत (41, रा. मोहिते कॉलनी) अभिमन्यू यशवंत कुरणे (55, रा. रमणमळा) अजित दिनकर मोरे (25, रा. हणबर गल्‍ली, कागल) या तिघांना मटका घेताना पकडण्यात आले. सर्व जण अभिजित यादव याच्यासाठी मटका घेत होते. पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.