Fri, Oct 30, 2020 18:22होमपेज › Kolhapur › राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले (video)

राधानगरीचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले (video)

Last Updated: Aug 07 2020 9:33AM

संग्रहीत छायाचित्रराधानगरी (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले राधानगरी धरण काल (दि. ६) सांयकाळी सहा वाजून ५५ मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरले. मात्र सकाळपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होता. यामुळे धरणात येणारे पाणी आणि वीज निर्मितीसाठी सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग काही काळ सारखाच राहिला. यामुळे सुमारे दोन ते तीन तास धरणांची पाणी पातळी स्थिर होती. यानंतर धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत गेल्याने रात्री अकरा व पहाटे तीन वाजता पुन्हा दोन स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पाण्याचा विसर्ग वाढला. दरम्यान, सायंकाळी सात वाजता धरण पूर्ण भरल्याने दोन स्वयंचलित दरवाजे उघडले होते. त्यानंतर पहाटे आणखी दोन मिळून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. 

‘अलमट्टी’मुळे कोल्हापूर, सांगलीवर महापुराचे सावट

सध्या धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडल्याने ५७१२ क्युसेक आणि पॉवर हाऊसचे १४०० क्युसेक असे एकूण प्रतीसेकंद तब्बल ७११२ क्यूसेक पाणी भोगावती आणि पंचगंगेच्या पात्रातून वाहत आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून महापूराची तीव्रता दिसत आहे. त्यामुळे भोगावती आणि पंचगंगेच्या पूररेषेमधील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

कोल्हापूरला महापुराचा धोका, पंचगंगेने धोका पातळी ओलांडली

कोल्हापूर शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, व्हिनस टॉकीज परिसरात पाणी शिरले

 "