Sat, Feb 29, 2020 00:15होमपेज › Kolhapur › हुतात्मा गार्डनच्या संवर्धनाचा प्रस्ताव

हुतात्मा गार्डनच्या संवर्धनाचा प्रस्ताव

Published On: Jan 16 2019 1:37AM | Last Updated: Jan 16 2019 12:16AM
कोल्हापूर ः पुनम देशमुख

समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या हुतात्मा गार्डनचे संवर्धन व्हावे, असा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. त्यानुसार प्रादेशिक पर्यटन योजनेतून या गार्डनसाठी दीड कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने जिल्हा नियोजन समितीला सादर केला आहे. 

दीड कोटींचा   निधी मंजूर झाल्यास या बागेचे रुपटेच पालटणार आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या नावाने हे उद्यान उभारण्यात आली आहे. या हुतात्मांची माहिती देणारा स्तंभ गार्डनच्या प्रवेशद्वारात कारंजानजीक उभारण्यात आला आहे. मात्र स्तंभाला भेगा पडल्या आहेत. तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे.  येथील खेळण्याची अवस्थाही दयनीय आहे.  या गार्डनलगत सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, गोखले महाविद्यालय, तसेच शाहू स्टेडियम, जलतरण तलाव आहे. त्यामुळे या परिसरात कायम वर्दळ असते. या गार्डनच्या  संवर्धनासाठी तज्ज्ञ व पूर्वानुभव सल्‍लागारांकडून आराखडा तयार करण्यात आला आहे.

हुतात्मा पार्कला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवण्यासाठी विविध विकासकामांसाठी दीड कोटींचा निधीची मागणी करण्यात आली आहे. या निधीतून पार्कच्या सुशोभिकरणासह अंतर्गत सजावट तसेच हुतात्मा स्तंभ याशिवाय गार्डनच्या पूर्व - पश्‍चिम बाजूच्या नाल्यास आरसीसी रिटेनिंग वॉल बांधणे आदी कामे करण्यात येणार आहेत.