Fri, Sep 25, 2020 13:46होमपेज › Kolhapur › रात्रीच्या वेळी धोकादायक पद्धतीने खेळ : बालचमूकडून तरुणांचे अनुकरण

आम्ही रस्त्यांवरच खेळणार...

Published On: Jun 06 2019 1:35AM | Last Updated: Jun 06 2019 12:20AM
कोल्हापूर : सागर यादव

कोल्हापूरची ओळख  ‘क्रीडानगरी’ अशी असल्याने सर्व प्रकारचे खेळ येथे अत्यंत आवडीने खेळले जातात. आबालवृद्ध विविध खेळांत उत्फूर्तपणे सहभागी होत असतात; पण काही लोक मैदाने सोडून थेट रस्त्यांवर खेळण्याचे धाडस करतात. हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. 

वाहनांसाठीच्या रस्त्यांवर खेळणे अपघातास निमंत्रणच आहे. शिवाय, यातून नाहक वादाचे प्रसंगही घडतात. यामुळे स्थानिक नागरिकांनी रस्त्यांवर खेळणार्‍यांना रोखणे गरजेचे आहे. परिसरातील तालीम, संस्था, तरुण मंडळांनी पुढाकार घेतल्यास असे चुकीचे प्रकार थांबविता येतील. पूर्वीच्या काळात रस्ते रिकामे असायचे. वाहनांचीही वर्दळही विशेष नसायची. मैदाने-उद्याने यांची कमतरता असल्याने लोक रस्त्यावरच खेळायचे. जुन्या काळात शिवकालीन युध्दकला, खो-खो, कबड्डी,लेझीम असे खेळ चालयाचे. कालओघात जुन्या खेळांची जागा नव्या खेळांनी घेतली. क्रिकेट-/ुटबॉल असे खेळ खेळले जावू लागले. दरम्यानच्या काळात मैदानांचीही संख्या वाढली यामुळे रस्त्यावर खेळण्याचे प्रकार दुर्मिळ झाले. 

अधुनिक युगात कॉम्प्युटर व मोबाईलमुळे मैदानी खेळांकडील लोकांचा कल कमी झाला आहे. सद्या मोेबाईलच्या जंजाळात आडकलेल्या तरुणाईला मैदानी खेळांचा विसर पडला आहे. यामुळे मैदानावर खेळणार्‍यांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. शाळा-महाविद्यालयाच्या सुटीच्या काळातही मैदाने रिकामीच असतात. एकीकडे याबाबतची चिंता असताना दुसरीकडे रस्त्यांवर खेळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. बहूतांशी ठिकाणी केवळ टाईमपास म्हणून खेळ खेळले जातात. यातून हुल्‍लडबाजीसारखे प्रकार घडतात. याचा गैर/ायदा घेवून एकमेकांबद्दलची खुन्नस काढणे, दादागिरी करणे, दहशत माजविणे असे प्रकार सुरु असतात. यातून अनेकदा हाणामार्‍या, दगड/ेक असे सामाजिक स्वास्थ्य बिघडणारे आणि कायदा  व सुव्यवस्था निर्माण करणार्‍या घटना घडतात. 

काही तरुण दिवसभराच्या धावपळीतून, दैनंदिन काम- व्यवसाय सांभाळून आपली खेळाची आवड जोपासण्यासाठी रात्री रस्त्यावर खेळतात. मात्र बहूतांशी तरुण केवळ टाईमपास म्हणून रस्त्यांवरील खेळात सहभागी होतात. खेळताना मद्यपी-गुटखा-सिंगारेट ओढणार्‍यांकडून विविध प्रकारच्या पैजा लावल्या जातात. यामुळे खेळात नाहक इर्षा वाढत जाते. यामुळे एकमेकांना खुन्नस देणे, बघूण थुंकणे, शिवीगाळ करणे, अंगावर धावून जाणे असे प्रकार घडतात. यातूनच अनेकदा मोठ्या हाणामारीचे प्रकार घडले आहेत. शिवाय रस्त्यावर ये-जा करणार्‍या सर्व वाहनांना अडथळा निर्माण होतो. बर्‍याचदा छोटे-मोठे अपघातही होतात. मोठ्या मुलांचे अनुकरण लहान मुलांकडून केले जाते. तेही रस्त्यावर येवून खेळतात. यामुळे अपघाचे धोके वाढतात. वाहनधारकांबरोबरच पादचार्‍यांनाही या खेळाचा त्रास सहन करावा लागतो. 

विरोध करणार्‍यांना त्रास..

शहरातील सर्व पेठा, उपनगरे यासह मध्यरात्रीपर्यंत /ुटबॉल, क्रिकेटसारखे खेळ सुरु असतात. ’आम्ही रस्त्यावरच खेळणार... कोण आडवतोय ते बघू .... ’, अशी अरेरावीची भाषा वापरत खेळाला विरोध करणार्‍यांना विविध प्रकारचा त्रासही दिला जातो. खेळात आडव्या येणारी वाहने हलवून इतरत्र नेवून लावणे, त्यांची मोडतोड करणे, खिडकीच्या काचा /ोडणे, त्यांच्या घरांना बाहेरून कढ्या लावणे, कार मधील साऊंड सिस्टीम लावून मोठ-मोठ्याने दंगा करत वाढदिवसांचे सेलिब—ेशन करणे असे प्रकार बिनधास्त सुरु असतात. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाबरोबरच स्थानिक नागरिकांची स्वयंशिस्त तितकीच गरजेची आहे.