होमपेज › Kolhapur › कोल्हापूर वाहतूक आराखडा पुढील वीस वर्षांसाठी करा

कोल्हापूर वाहतूक आराखडा पुढील वीस वर्षांसाठी करा

Last Updated: Dec 04 2019 12:44AM
कोल्हापूर ः प्रतिनिधी 
कोल्हापूर शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. त्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास सविस्तर आराखड्याची आवश्यकता असते. राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरणानुसार कोल्हापूर शहराचा पुढील वीस वर्षांसाठीचा सर्वसमावेशक वाहतूक आराखडा कन्सल्टंट कंपनीकडून तयार करून घ्यावा, असे आदेश महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी मंगळवारी महासभेत प्रशासनाला दिले. आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.

वाहतुकीच्या दंडाची ५० टक्के रक्‍कम मनपाला

शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून शहरात नो-पार्किंग, सम-विषम पार्किंग ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर  कारवाई करण्यात येते. त्या दंडातील 50 टक्के रक्‍कम पुणे मनपाच्या धर्तीवर विमोजन शुल्क म्हणून कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मनपाकडे जमा करावी. स्पीडब्रेकर दुरुस्ती, त्यांची रंगरंगोटी, झेब्रा क्रॉसिंग पट्टे, सेंटर लाईन पट्टे, साईट पट्टे मारणे, सोलर ब्लिंकर बसविणे, रंबलर पट्टे मारणे, बॅरिकेडस् बसविणे आदी ट्रॅफिकविषयी कामे या रकमेतून करण्यात येतील.