Wed, Jul 08, 2020 09:26होमपेज › Kolhapur › ‘दक्षिणे’त पाटील-महाडिक ईर्ष्येची लढत

‘दक्षिणे’त पाटील-महाडिक ईर्ष्येची लढत

Published On: Sep 17 2019 1:51AM | Last Updated: Sep 16 2019 9:22PM
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील मतदारसंघ म्?हणून ओळखला जातो. या मतदार संघाच्?या निर्मितीपासूनच येथे सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्?या गटातील  ‘हाय व्होल्?टेज’ लढती राज्?याने अनुभवल्?या आहेत. या मतदार संघातील सोसायटीची निवडणूकसुद्धा गटाच्या प्रतिष्ठेसाठी लढवली जाते. 

या मतदार संघात कार्यकर्ता एकतर महाडिक गटाचा किंवा पाटील गटाचा, इतके ईर्ष्येबाज वातावरण इथे प्रत्येक ठिकाणी आहे. भाजपचे आ. अमल महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्यात ‘दक्षिण’च्या कसदार राजकीय मैदानावर जंगी कुस्ती निश्‍चित झाली आहे. आ. पाटील यांच्यावर काँगे्रस पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे. तर भाजपवासी झालेले माजी खा. धनंजय महाडिक यांनाही पक्षाने प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी दिली आहे. ‘दक्षिण’मध्ये उमेदवारांपेक्षा आ. पाटील व माजी खा. महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील मतांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक उमेदवार होते, तर त्यांच्याविरोधात शिवसेना-भाजप युतीचे प्रा. संजय मंडलिक हे युतीचे उमेदवार होते. प्रा. मंडलिक यांनी महाडिक यांच्यावर मोठ्या मताधिक्याने मात केली. प्रा. मंडलिक यांच्या विजयात ‘दक्षिण’च्या 43 हजारांवर मताधिक्याचा वाटा होता. त्यापूर्वी 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघाने महाडिक यांना 7254 इतके मताधिक्य दिले होते.  

धनंजय महाडिक यांचा पराभव म्हणजे 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीतील सतेज पाटील यांच्या पराभवाचा वचपा काढल्याची भावना पाटील गटाकडून व्यक्‍त करण्यात आली. 2009 साली झालेल्या निवडणुकीत आ. पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असा सामना झाला होता. या निवडणुकीत निसटत्या मतांनी पाटील निवडून आले. 2014 साली दक्षिण विधानसभा मतदार संघातून तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेले पाटील हे सहज निवडून येतील, अशी स्थिती होती. परंतु, ऐनवेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल यांना आ. पाटील यांच्याविरोधात महाडिक गटाने मैदानात उतरवले. तुलनेने नवखे असलेले अमल हे महाडिक गटाची ताकद आणि मोदी लाट यामुळे आमदार झाले. यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांना सतेज पाटील यांनी हरवले. विधान परिषदेसाठी त्यांचा अद्याप तीन वर्षांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे त्यांनी आगामी राजकारणाची व्यूहरचना म्हणून पुतण्या ऋतुराज यांना आ. अमल यांच्याविरोधात मैदानात उतरवले आहे. 

या मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस नव्हे, तर सतेज पाटील की महादेवराव महाडिक असा हा थेट सामना आहे. साम, दाम, दंड, भेद असे सगळे या मतदार संघात वापरले जाते. धनंजय महाडिक यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांनी सतेज पाटील गटाचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. महाडिक हे आता अधिकृतरीत्या भाजपवासी झाले असल्याने, प्रचारात ते अग्रभागी असतील. तर पुतण्यासाठी आ. पाटील हे सगळी सूत्रे हलवतील, हे स्पष्ट आहे. प्रा. बी. जी. मांगले हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.

‘दक्षिण’मध्ये 36 गावे ही ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतात, तर शहरातील 26 प्रभाग आहेत. 3 लाख 20 हजारांहून अधिक मतदार या मतदार संघात आहेत. मागील निवडणुकांचा अनुभव पाहता राजकीय पक्षांचे निष्ठावान मतदार या मतदार संघात खूप कमी आहेत. मात्र, गटाचा जोर मोठा आहे.  रक्‍तरंजित राजकारणाचा भूतकाळ असलेल्या या मतदार संघातील निवडणूक नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई 
आहे.

आ. अमल हे कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या जोरावर मतदारांना आवाहन करत आहेत. सत्ताधारी भाजप या मतदार संघासाठी अधिक ताकद लावेल, हे स्पष्ट आहे. आमच्या काळात विकासाचा डोंगर उभा केला होता, आता हा मतदारसंघ वार्‍यावर सोडला आहे, असा दावा आ. पाटील यांच्याकडून केला जात आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधी दोन्ही गटांकडून रणशिंग फुंकले आहे. आता प्रत्यक्षात मतदार कुणाच्या बाजूने कल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.