Sat, Apr 10, 2021 19:22शनिवारी पास्ता मेकिंग कार्यशाळा

Last Updated: Dec 03 2020 1:15AM
कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा

कस्तुरी क्लबमार्फत महिलांसाठी नेहमीच अनेक कार्यशाळा राबविल्या जातात आणि प्रत्येक कार्यशाळेत नावीन्य असतेच. आताही क्लबमार्फत पास्ता मेकिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मधल्यावेळच्या खाण्यासाठी मुलांना काय नवीन करून द्यावे, हा प्रश्न गृहिणींना पडतो. म्हणूनच मुलांना आवडतील असे चटपटीत पास्ताचे विविध प्रकार पास्ता  सॉससह आता घरच्या घरी बनविता येणार आहेत. 

कार्यशाळा शनिवार, दि. 5 डिसेंबर रोजी दु. 2.30 वाजता होणार असून कार्यशाळेत रेड सॉस पास्ता, व्हाईट सॉस पास्ता, वेजी पास्ता, पेस्टो पास्ता, लाझानिया, पिंक सॉस पास्ता, पेने, बेक मकरोनी चीझ इत्यादी प्रकार शिकवले जाणार आहेत.  या कार्यशाळेसाठी 350 रुपये शुल्क असून पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : टोमटो एफ. एम. वसंत प्लाझा, बागल चौक कोल्हापूर. मोबा. क्र. 8483926989 किंवा 9096853977. 

महत्त्वाची सूचना : कार्यशाळेस येताना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक.