कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर आणि परिसरातील लोकप्रिय रेडिओ चॅनेल '94.3 टोमॅटो एफएम'तर्फे अनोखा फॅनक्लब सुरू होत आहे. त्याच्या काँटेस्टमध्ये आपण सहभागी होवून आकर्षक बक्षिसं जिंकू शकता. (Participate in 94.3 Tomato FM Fan club Contest and win prizes)
फॅनक्लबमध्ये दर महिन्याला ज्या सेलिब्रिटींचे वाढदिवस, जयंती किंवा पुण्यतिथी असेल; त्यातील दोन सेलिब्रिटिंसाठी फेसबुकवर व्होटिंग पोल असेल. चाहत्यांनी फेसबुकवर आपल्या आवडत्या कलाकाराला व्होट करायचं आहे. ज्यांचे व्होट्स जास्त असतील त्यांचा फॅनक्लब विजेता ठरणार आहे.
त्याचबरोबर आपल्या आवडत्या कलाकारासाठी आपण दिलेल्या कॉमेंट्समधल्या सगळ्यांत चांगल्या कॉमेंटला बक्षिस मिळणार आहे.
त्याचबरोबर '94. 3 टोमॅटो एफएम'वरून त्या त्या सेलिब्रिटींबद्दलची रंजक माहिती नामवंत कलाकारांकडून प्रसारित केली जाईल.
जानेवारी महिन्यामध्ये ए. आर. रहमान आणि आर. डी. बर्मन या दोन संगीतकरांसाठी आपल्याला व्होट करायचे आहे. यामधील तुमच्या आवडत्या संगीतकाराला व्होट करण्यासाठी '94.3 टोमॅटो एफएम'च्या फॅनक्लबसाठी ऑफिशियल फेसबुक पेजवर जाऊन सहभागी व्हा.