Sun, Jul 05, 2020 05:21होमपेज › Kolhapur › पाकिस्तानच्या ध्वजाची कोल्हापुरात होळी (व्हिडिओ)

पाकिस्तानच्या ध्वजाची कोल्हापुरात होळी (व्हिडिओ)

Published On: Dec 30 2017 1:33PM | Last Updated: Dec 30 2017 1:55PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात अटकेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान सरकारकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शिवाजी चौकात पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करण्यात आली. कार्यकर्त्यानी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निदर्शने केली.

भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात हेरगिरीच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान सरकारने त्यांना फाशी देण्याचा कुटील डाव आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळून लावला. बर्‍याच प्रयत्नांनतर कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात पाकिस्तानात त्यांच्या कुटुंबियांच्या महिलांना हिन दर्जाची वागणूक देण्यात आली. मंगळसूत्र, टिकली, चपला काढून पाकिस्तानने भारतीय स्त्री संस्कृतीचा अपमान केला गेला. प्रत्यक्षात भेट न देता काचेच्या आडून भेटण्यास मूभा दिली गेली. हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. कुलभूषण जाधव यांना सोडविण्यात केंद्र सरकार कमी पडले आहे. 

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शहराध्यक्ष दुर्गेस लिंग्रस, शिवाजी जाधव, रवी चौगुले, राजू यादव, अवधूत साळोखे, रणजित आयरेकर, महिला आघाडीच्या शुंभागी पवार, रिया पाटील, सुजाता सोहनी, सुनिता निकम, सुवर्णा कारंडे, मीना भोसले, पूजा मिसाळ, जयश्री खोत आदी आंदोलनात सहभागी झाले होते.