कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
लॉकडाऊन काळात अनेकांच्या मॉर्निंग वॉकवर गदा आली. अनेकांची जीम बंद झाली. व्यायाम बंद असून घरी बसून आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी योग्य आहार घेऊन आपण आपला फिटनेस कसा राखायचा, वेट लॉस कसा करायचा, हे सांगण्यासाठी दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने ‘वेट लॉस सेमिनार’ फेसबूक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज गुरुवार, दि. 14 रोजी दुपारी 4 वाजता डॉ. रोहिणी पाटील याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 6 वाजता झुंबा अॅरोबिक्सचे लाईव्ह सेशन होणार आहे.
वजन कमी करण्यासाठी, आटोक्यात ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, कोणते टाळले पाहिजेत, याची सर्व माहिती, प्रमाणासहीत त्या देणार आहेत. वेट लॉस लाईव्ह सेमिनारचा लाभ घेण्यासाठी फेसबूकवर kasturi club pudhari पेज फॉलो करा लाईक करा आणि www.facebook.com/ tomatobrigade वर लॉगईन करून कार्यक्रमाचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 8483926989, 9096853977.