Thu, Feb 27, 2020 22:04होमपेज › Kolhapur › गंगा नदीचे पाणी पिण्यासाठीच नव्हे; अंघोळीसाठीही अयोग्य : सीपीसीबी

गंगा नदीचे पाणी पिण्यासाठीच नव्हे; अंघोळीसाठीही अयोग्य : सीपीसीबी

Published On: Jun 01 2019 2:01AM | Last Updated: Jun 01 2019 12:17AM
नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

देशात पवित्र समजल्या जाणार्‍या गंगा नदीचे पाणी थेट पिण्यासाठीच नव्हे, तर अंघोळीसाठीही योग्य नसल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) म्हटले आहे. नदी वाहत असलेल्या ठिकाणांपैकी केवळ सात ठिकाणांचे पाणी शुद्धीकरण प्रक्रियेनंतरच आपण पिण्यास वापरू शकतो. सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशपासून पश्‍चिम बंगालपर्यंत गंगा नदीचे पाणी पिण्यास योग्य नाही. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या एका नकाशात गंगा नदीत ‘कोलिफोम’ जीवाणूचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दाखविले आहे. एकूण 86 ठिकाणी स्थापलेल्या थेट निरीक्षण केंद्रांपैकी केवळ सात भाग असे आढळले आहेत की, जेथील पाणी शुद्धीकरण प्रक्रियेनंतरच पिण्या योग्य ठरणार आहे. तर 78 भागांमधील पाणी पिण्यास अयोग्य आहे. नदीच्या पाण्याच्या गुणवत्ता तपासणीसाठी देशभरात गंगा नदीपात्रात थेट निरीक्षण केंद्रांकडून माहिती संकलित केली आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे, की गंगा नदीचे पाणी एवढे प्रदूषित झाले आहे, की ते पिण्यास तर सोडाच; पण अंघोळीसाठीही आता उपयुक्‍त नाही.